तुम्हाला माहित आहे का? भारतीय संघ तटस्थ ठिकाणी (neutral venue) आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. तो कसोटी सामना म्हणजे 2021 डब्लूटीसी फायनल होय. तेव्हा भारताचा न्यूझीलंडने पराभव करत विश्वविजेतेपद जिंकले होते. आता भारत दुसऱ्यांदा तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना देखील डब्लूटीसीचीच फायनल आहे. भारत 7 जुन रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे विश्वविजेतेपदासाठी दोन हात करेल.
ऑस्ट्रेलिया संघ 2002 ते 2018 या काळात पाकिस्तानविरुद्ध 8 कसोटी सामने तटस्थ ठिकाणी खेळला असून, 4 सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला आहे. तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळविण्यासाठी इंग्लंड, युएई अनेक देशांचं आवडतं ठिकाणं आहे.
पाकिस्तान सर्वाधिक 39 कसोटी सामने 1999 ते 2018 या काळात तटस्थ ठिकाणी खेळला असून बांगलादेश, युएई आणि इंग्लंड येथे विशेषकरुन ते सामने खेळले आहेत. तेच बहुतांशवेळा या सामन्यांचे यजमान राहिलेत. श्रीलंका 9, न्यूझीलंड 7, दक्षिण आफ्रिका 7, इंग्लंड 6, वेस्ट इंडिज 6 अफगाणिस्तान 4, झिबांब्वे 2, भारत आणि आयर्लंड प्रत्येकी 1 सामने खेळले आहेत.
भारतात अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड व अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज हे दोन सामने झाले आहेत. याशिवाय आजपर्यंत भारत हा कधीही तटस्थ कसोटीसाठी व्हेन्यू राहिलेला नाही. यात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला जी हवी ती मदत करण्याच्या हेतून भारताने अफगाणिस्तानला ही मदत केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कधीही फारसे तटस्थ ठिकाणी कसोटींसाठी आग्रही नसते. परंतू डब्लूटीसीमुळे भारतीय संघ एवढ्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा तटस्थ ठिकाणी कसोटी क्रिकेट खेळतोय.
तटस्थ ठिकाणी सर्वाधिक 19 कसोटी विजय पाकिस्तान संघाने मिळवले आहेत. इंग्लंड भारत व आयर्लंड यांना तटस्थ ठिकाणी कधीही विजय मिळवता आलेले नाही. तर ऑस्ट्रेलिया संघाने ६ कसोटी विजय तटस्थ ठिकाणी मिळवले आहेत.
पाकिस्तानचे फलंदाज सोडून तटस्थ ठिकाणी सर्वाधिक धावा केन विलियमनसनने केल्या आहेत. त्याने 7 सामन्यात 748 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत पाकिस्तानचे गोलंदाज सोडून श्रीलंकेच्या रंगना हेराथने सर्वाधिक 8 सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत.
1992 साली तटस्थ ठिकाणी इंग्लंड येथे दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. तो पहिला सामना होता. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा तटस्थ ठिकाणी झालेला शेवटचा कसोटी सामना आहे.
(Indian Cricket Team Play Only Test At Neutral Venue In WTC Final 2021)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत
जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video