IPLक्रिकेटटॉप बातम्या

जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video

चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. यासह त्यांनी पाचव्यांदा ट्रॉफी उंचावण्याचा पराक्रम गाजवला. चेन्नईच्या या विजयामुळे स्टेडिअममधील चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला होता. असे जरी असले, तरीही देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी अंतिम सामन्यातील चेन्नईचा विजय पाहून सीएसके चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जल्लोष केला. विशेष म्हणजे, चाहत्यांनी मेट्रो स्टेशनही सोडले नाही. आता सोमवारी (दि. 29 मे) चेन्नई मेट्रो स्टेशनमधील रात्री जवळपास 2 वाजताचा क्रिकेट चाहत्यांचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यात चाहते विजयी चौकार मारल्यानंतर जबरदस्त सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत क्रिकेट चाहते चेन्नई मेट्रो स्टेशनवर (Chennai Metro Station) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पाहत होते. या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जसे चौकार मारून चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयी केले, तसे क्रिकेट चाहते मेट्रो स्टेशनमध्येच नाचू लागले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओतून चेन्नई संघाचे चाहते सीएसकेने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकल्यामुळे किती खुश होते, हे दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 20 हजारांहून अधिक लाईक्सचाही पाऊस पडला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सीएसके हा संघ नाहीये, तर चाहत्यांसाठी कुटुंब आहे.”

दुसऱ्याने असेही विचारले की, “रात्री 2 वाजता चेन्नई मेट्रो कुणी सुरू ठेवली होती?”

सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शन याच्या 46 चेंडूत 96 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाच्या सुरुवातीला पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे चेन्नईपुढे विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान चेन्नईने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत पार केले आणि पाचव्यांदा ट्रॉफी उंचावली. (fans celebration in chennai metro station after csk win ipl 2023 title video viral see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप, तरीही दिनेश कार्तिकची WTC फायनलमध्ये एन्ट्री, लवकरच होणार इंग्लंडला रवाना
भारीच ना! भारताचा जखमी वाघ वेगाने होतोय बरा, पंतच्या कमबॅकवर आलं आनंदी करणारं अपडेट

Related Articles