आयपीएल संपली! आता वर्ल्डकपर्यंत टीम इंडिया एकदम बिझी, या संघांना देणार चॅलेंज

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाची नुकतीच समाप्ती झाली. तब्बल दोन महिने चाललेल्या या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद पटकावले. आता या स्पर्धेनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा आपल्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाकडे वळेल. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या आठच दिवसात भारतीय संघ मैदानात दिसेल. यंदा भारतातच वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. तोपर्यंत भारतीय संघ कोणत्या कोणत्या स्पर्धा व मालिका खेळणार हे आपण जाणून घेऊया.
आयपीएल संपल्यानंतर अवघ्या आठ दिवसात भारतीय संघ वर्षातील आपल्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरा जाईल. 7 जून पासून लंडन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. मागील वेळी भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागलेला. त्यामुळे यावेळी भारतीय संघ विजयाचा प्रयत्न करेल.
यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल. तिथे दोन कसोटी, तीन वनडे व तीन टी20 सामने भारतीय संघ खेळणार आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात बहुप्रतिक्षित आशिया चषक नियोजित असून, तो कोणत्या देशात खेळला जाईल हे लवकरच निश्चित होईल.
यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान देखील वनडे मालिका खेळली जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केली गेली नाही.
या सर्व मालिकांनंतर 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे विश्वचषकाचा थरार रंगेल. विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघाला दोन सराव सामने देखील खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाकडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अगदी कमी कालावधी शिल्लक असेल.
(Team India Schedule After IPL 2023 To ODI World Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत
जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video