चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला शानदार खेळ सुरू ठेवला. अ गटाच्या साखळी फेरीचा सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 10-2 दारुण पराभव केला. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी भारतीय हॉकी संघाला भारतीय क्रिकेट संघाचा पाठिंबा मिळाला. स्टॅन्डमध्ये बसून भारतीय संस्कार हा संपूर्ण सामना पाहिला.
या स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार म्हणून भारतीय हॉकी संघ दाखल झालेला आहे. भारताने उझबेकिस्तान व सिंगापूरविरुद्ध दोन दणदणीत विजय साजरे केले होते. त्यानंतर गटातील तिसऱ्या सामन्यात ही भारतीय संघाने आपली तीच आक्रमकता दाखवली. कर्णधार हरमनप्रीत सिंग याने धमाकेदार हॅट्रिक केली. त्यामुळे भारतीय संघ 10-2 असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
A support from Indian Cricket Team for Indian Hockey Team 🏏🇮🇳🏑pic.twitter.com/Ul67D69Fqd
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 30, 2023
भारतीय हॉकी संघाला या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा जोरदार पाठिंबा लाभला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतूराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, आवेश खान, अर्शदीप सिंग व प्रभसिमरन हे सर्व खेळाडू स्टॅन्ड मध्ये बसून भारतीय संघाला चीअर करत होते. त्याची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
भारताच्या पुरुष क्रिकेट संघाला देखील या विश्वचषकात सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ 3 ऑक्टोबर रोजी आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल. तर अंतिम फेरीचा सामना 7 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेत यापूर्वी सुवर्णपदक जिंकले आहे.
(Indian Cricket Team Support Hockey Team In Asian Games)
हेही वाचा-
विश्वचषक 2011मध्ये सचिनने दिलेला ‘विमानतळावर हेडफोन घालण्याचा’ सल्ला, युवराजचा खुलासा
इतिहास ODI World Cupमधील पहिल्या सामन्यांचा, वाचा सर्वाधिक वेळा कुणाच्या पदरी पडलाय विजय