भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) 2024-25 साठी टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक जारी केलं आहे. भारतीय संघ सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान भारतात एकूण 16 सामने खेळणार आहे. यामध्ये 5 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 8 टी20 सामन्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, या 16 सामन्यांपैकी एकूण 5 सामने महाराष्ट्रात खेळले जाणार आहेत. यापैकी 2 सामने मुंबईत, 2 पुण्यात तर एक सामना नागपुरात खेळला जाईल.
पुण्यातील सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यापैकी दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जाणार आहे. हा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळला जाईल. जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील 5 टी20 सामन्यांपैकी चौथा सामना पुण्यात खेळला जाणार आहे. हा सामना 31 जानेवारी 2025 रोजी गहुंजे येथील स्टेडियमवर खेळला जाईल.
मुंबईतील सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडच्या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईत खेळला जाईल. हा सामना 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध पाचवा टी20 सामना खेळला जाईल.
विदर्भातील नागपुरात देखील एका सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. येथे 6 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल.
सर्व सामन्यांचं वेळापत्रक खालीलप्रमाणे
बांग्लादेशचा भारत दौरा
पहिली कसोटी – 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई.
दुसरी कसोटी – 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर.
पहिला टी20 सामना- 6 ऑक्टोबर, धर्मशाला.
दुसरा टी20 सामना- 9 ऑक्टोबर, दिल्ली.
तिसरा टी20 सामना- 12 ऑक्टोबर, हैदराबाद.
न्यूझीलंडचा भारत दौरा
पहिली कसोटी – 16 ते 20 ऑक्टोबर, बेंगळुरू.
दुसरी कसोटी – 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे.
तिसरी कसोटी – 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई.
इंग्लंडचा भारत दौरा (2025)
22 जानेवारी – पहिला टी20, चेन्नई
25 जानेवारी – दुसरी टी20, कोलकाता
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट
31 जानेवारी – चौथी टी20, पुणे
2 फेब्रुवारी – पाचवी टी20, मुंबई
6 फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना, नागपूर
9 फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, कटक
12 फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद
महत्त्वाच्या बातम्या –
सुपर 8 सामन्यात बांग्लादेशचे हे 3 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, टीम इंडियाला राहावं लागेल सावध
विराट कोहलीचा विश्वविक्रम धोक्यात, सूर्यकुमार यादवनं अवघ्या 64 सामन्यांत रचला इतिहास!
140 कोटी भारतीयांना रडवणारा खेळाडू बनला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’, रिकी पाँटिंगच्या हस्ते मिळाली ट्रॉफी