---Advertisement---

Chandrayan3: टीम इंडियाने आयर्लंडमधून पाहिला विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचा क्षण, व्हिडिओ पाहा

On: बुधवार, ऑगस्ट 23, 2023 8:20 PM
---Advertisement---

इस्त्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 3 अखेर यशस्वी झाली. बुधवारी (23 ऑगस्ट) चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश होण्याचा मान भारताने मिळवला. तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असलेला हा क्षण भारतीय क्रिकेट संघाने डब्लिन येथून पाहिला. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1694331818563240321?t=GJfIrsgoNiYUBfk0JmQoQA&s=19

इस्रो या भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने मागील अनेक वर्षांपासून या मोहिमेवर काम केले होते. अखेर विक्रम लँडर  हे संशोधन करणार आहे. अमेरिका चीन व रशिया यांच्यानंतर चंद्रावर पोहोचणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला. समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या आयर्लंड येथे असून, ते थेट तेथून टेलिव्हिजनवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. कर्णधार बुमराह तसेच सपोर्ट स्टाफ व सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवून वैज्ञानिकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

(Indian Cricket Team Witness Historic Chandrayan 3 Landing)

हेही वाचा-
आयर्लंड दौरा गाजवत असलेल्या बुमराह-प्रसिद्धविषयी भारतीय प्रशिक्षकाचे विधान; म्हणाला, ‘विश्वचषकापूर्वी…’
शंभर चेंडूंच्या लीगमध्ये फलंदाज बनला रिंकू सिंग; 5 चेंडूत ठोकले 5 जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---