---Advertisement---

‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मान यंदाही भारताच्या पारड्यात, ‘हा’ क्रिकेटपटू ठरला विजेता

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 1:55 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने मागील काही महिन्यांपासून दर महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला एका पुरस्काराने गौरवण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार म्हणजेच ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार होय. जानेवारी महिन्यापासून हा पुरस्कार दिला जात आहे.

मागील मार्च महिन्यातील सर्व क्रिकेटपटूंची कामगिरी पाहिल्यानंतर आज (१३ एप्रिल) आयसीसीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. अनुभवी भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार मार्च महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ठरला आहे. विशेष बाब म्हणजे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने हा पुरस्कार जिंकण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

भुवनेश्वरव्यरितिक्त आयसीसीने मार्च महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचे नामांकन अफगानिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटपटूचा सिन विलियम्स यांना दिले होते. परंतु भारत विरुद्ध इंग्लंड मर्यादित षटकांच्या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर भुवनेश्वर या पुरस्काराचा विजेता ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत त्याने २२.५० च्या सरासरीने ६ विकेट्स चटकावल्या होत्या. तर टी२० मालिकेत २८.७५ च्या सरासरीने ४ विकेट्स घेतल्या होत्या.

अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार 
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.

आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.

व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

हे पोरग भारीय, त्याला संधी देऊन पाहा; जेव्हा ‘या’ भारतीय क्रिकेटरने द्रविडकडे केली होती संजूची शिफारस

ख्रिस गेलला बाद केल्यानंतर रियान परागचा आनंद अनावर, केला भन्नाट बिहू डान्स; व्हिडिओ व्हायरल

चेतन सकारियाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय दिग्गजाचं भावनिक ट्विट; म्हणाले, ‘भावाच्या आत्महत्येची..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---