भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवला. मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने 83 चेंडूंत 9 चौकार आणि 6 षटकारांसह शानदार शतक झळकावले. रोहितने यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये शतक झळकावले होते. या सामन्यात शतक करण्यासोबतच रोहितने 128 चेंडूत 119 धावा करत 8 चौकार आणि 6 षटकार भिरकावले. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने पाकिस्तानच्या माजी दिग्गजाला मागे टाकले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा सहावा फलंदाज बनण्याची संधी आहे. वनडे सामन्यांमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा तो एकूण 15 वा फलंदाज असेल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांनी भारतासाठी हा पराक्रम केला आहे. सक्रिय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणाऱ्या बहुतेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. अव्वल 20 खेळाडूंच्या यादीत विराट आणि रोहित सक्रिय क्रिकेटपटू आहेत.
रोहितने 241 वनडे सामन्यांमध्ये 48.91 च्या सरासरीने 9782 धावा केल्या आहेत. त्याने 9720 धावा करणारा पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफला मागे टाकले. रोहित वनडेत 10 हजार धावा पूर्ण होण्यापासून फक्त 218 धावा दूर आहे. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो हा टप्पा गाठू शकतो.
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करु शकतो. तसेच, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्चमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेत हा टप्पा गाठू शकतो. त्याच्या आधी 5 भारतीयांनी ही कामगिरी केली आहे.
𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬! 🔥
Talk about leading from the front! 🙌🏻
A magnificent century from #TeamIndia captain @ImRo45 💯
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/iR3IJH3TdB
— BCCI (@BCCI) January 24, 2023
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसऱ्या वनडेत रोहितने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 42वे आणि वनडेतील 30 वे शतक ठोकले आहे. त्याचबरोबर सलामीवीर म्हणून 28 वे शतक ठोकले आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर (49) आणि विराट कोहली (46) यांनी त्याच्यापेक्षा जास्त वनडे शतके झळकावली आहेत. (Indian cricketer captain rohit sharma break the record of pakistan former cricketer mohammad yousuf)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: आणखी एक आयसीसी पुरस्कार भारतात! रेणुका ठाकूर ठरली एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर
इंदोरमध्ये घोंघावले ‘हिटमॅन’ वादळ! तब्बल 1100 दिवसांनी रोहितचे वनडे शतक