---Advertisement---

जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने रिनी नावाच्या मुलीबरोबर मंगळवारी लग्न केले आहे. गुजरातमधील आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान जयदेव आणि रिनीच्या कुंटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता, असे समोर येत आहे.

त्यांच्या विवाहासंदर्भात जयदेव किंवा रिनी यादोघांपैकी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यांनी त्यांच्या विवाहाला गुप्त ठेवण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र, त्यांच्या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. जयदेव आणि रिनीच्या जवळच्या मित्रपरिवाराने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

https://www.instagram.com/p/CKzTRwcsozf/

मागीवर्षी केला होता साखरपूडा

जयदेव उनाडकटची पत्नी रिनी ही पेशाने वकील असून तिने जयदेवसह मागीलवर्षी मार्चमध्ये साखरपूडा केला होता. जयदेवने मागीलवर्षी रिनीसह फोटो शेअर करत त्यांचा साखरपूडा झाला असल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

जयदेव-रिनीच्या लग्नासाठी सौराष्ट्र संघातील खेळाडूंची उपस्थिती –

जयदेव आणि रिनीच्या लग्नासाठी सौराष्ट्र संघातील काही खेळाडूंनीही उपस्थिती दर्शवली होती. जयदेव हा सौराष्ट्र संघाचा कर्णधार असून त्याने मागीलवर्षी त्याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाला रणजी करंडक जिंकून दिला आहे. विशेष म्हणजे रणजी करंडक जिंकल्यानंतर दोनच दिवसात त्याने रिनीसह साखरपूडा केला होता.

Screengrab : Instagram/Dharmendrasinh Jadeja

जयदेवची कारकिर्द –

जयदेव उनाडकटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ कसोटी, ७ वनडे आणि १० टी२० सामने खेळले आहेत. यात मिळून त्याने २२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ८९ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३२७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ९४ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १३३ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १४९ ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांत १७८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

दमदार सुरुवातीनंतरही भारतीय संघातून बाजूला केलेला सदागोपन रमेश

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

ATP Cup : नदालची पाठदुखीमुळे माघार; तर जोकोविचच्या सार्बियन संघाची विजयाने दिमाखात सुरुवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---