---Advertisement---

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात

---Advertisement---

अर्जेटिनाला १९८६ फुटबॉल विश्वचषक जिंकून देणार्‍या दिएगो मॅराडोना यांनी बुधवारी(२५ नोव्हेंबर) वयाच्या साठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘हँड ऑफ गॉड’ या विवादीत गोलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दिग्गजाच्या निधनाने जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये सामान्य माणसेच नव्हे तर, क्रीडा जगतातील खेळाडूंची नावेही समाविष्ट आहेत. भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गज खेळाडूंनीही त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.

मॅरेडोना यांच्या निधनानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीसुद्धा दु: खी झालेली दिसली. झूलनने ट्विटकरून मॅराडोना यांनी आपल्याला कसे प्रभावित केले हे सांगितले.

“मॅराडोना गेले यावर विश्वास बसत नाही”

भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वात अनुभवी गोलंदाज असलेल्या झूलनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की, माझे बालपणीचे आदर्श मॅराडोना आता राहिले नाहीत. ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान होते. मी त्यांच्याकडून प्रेरणा घेत खेळात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला होता. मी घालत असलेली १० क्रमांकाची जर्सी त्यांना पाहूनच वापरायला सुरुवात केली होती. मॅराडोना तुमची कायम आठवण येईल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो!”

झूलनने बुधवारी आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. त्याचदिवशी आपल्या आदर्शाचे निधन झाल्याने ती व्यथित झाली. झूलनने मॅराडोना यांच्या निधनानंतर, आपल्या ट्विटर टाईमलाईनवर मॅराडोना यांचे छायाचित्र लावले आहे.

भारताची सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटू आहे झूलन

झूलन गोस्वामी सन २००२ पासून भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिने काही काळ भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले होते. झूलनने २००७ मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. युएईमध्ये नुकत्याच संपलेल्या ‘वुमन्स टी२० चॅलेंज’ स्पर्धेत विजेत्या ट्रेलब्लेझर्स संघाची ती प्रमुख वेगवान गोलंदाज होती.

सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली मॅराडोना यांना श्रद्धांजली

मॅराडोना यांना क्रीडाक्षेत्रासह सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मॅराडोना यांना श्रद्धांजली अर्पण केली. सिनेक्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांनीही मॅराडोना यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या –

“एक दिवस आकाशात फुटबॉल खेळूया”, मॅराडोना यांना पेलेंची अनोखी श्रद्धांजली

‘माझा हिरो जगातून निघून गेला’, मॅराडोनाच्या निधनानंतर सौरव गांगुलीचे भावुक ट्वीट

“दिएगो मॅराडोना फुटबॉलचे उस्ताद”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---