---Advertisement---

भारताकडून त्रिशतक करणारा करुण नायर अडकला विवाह बंधनात…

On: रविवार, जानेवारी 19, 2020 3:53 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा भारताचा दुसरा क्रिकेटपटू करूण नायर गुरुवारी लग्नबंधनात अडकला. त्यानेने उदयपुरमधील फतहगढ़ रिसोर्टमध्ये आपली प्रेयसी शनाया टंकरीवाला सोबत गुरूवारी(16 जानेवारी) सकाळी दक्षिण भारतीय परंपरेनुसार तर संध्याकाळी पारसी परंपरेनुसार लग्न केले.

करूण नायर आणि शनाया बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. मागच्या वर्षी जूनमध्ये करूण नायरने शनायाला लग्नासाठी मागणी घातली.

करूण नायर कर्नाटकसाठी देशांअतर्गत क्रिकेट खेळतो. कर्नाटक रणजी संघाने दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करूण नायरने भारताकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये चेन्नई येथे इंग्लड विरूद्ध त्रिशतकी खेळी खेळली होती. त्याने नाबाद 303 धावा केल्या होत्या. त्यावेळी तो भारताकडून कसोटीमध्ये त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवाग नंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला होता.

https://twitter.com/RanjiKarnataka/status/1217708438471340032

या त्रिशतकानंतर त्याला तीन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. पंरतू त्या तीन सामन्यात तो काही खास करू शकला नाही. 2017 मध्ये धर्मशाला येथे ऑस्ट्रेलिया विरूद्ध करूणने आपला अंतिम कसोटी सामना खेळला होता. तेव्हा पासून तो भारतीय संघातून बाहेर आहे.

करूणने कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय  संघाकडून त्याने 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 374 धावा केल्या आहेत. तर दोन वनडे सामने खेळले या दोन सामन्यात त्याने 46 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1218521280128802817

https://twitter.com/Maha_Sports/status/1218509488363147264

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---