काही खेळाडू हे अष्टपैलू असतात, सर्वगुण संपन्न असतात परंतु, ते प्रकाशझोतात येत नाहीत. असाच एक प्रतिभावान भारतीय खेळाडू म्हणजे हुकुमाचा एक्का लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) होता. हा असा खेळाडू होता ज्याने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण केले होते.
मद्रास (आत्ताचे चेन्नई नाव) ही जन्मभूमी असलेला हा फिरकीपटू. या खेळाडूचा आज (31 डिसेंबर) 57 वा वाढदिवस आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही फार मोठी नव्हती. त्यांनी 1983 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1987 मध्ये खेळला. या फिरकीपटूने आपल्या कारकीर्दीत 9 कसोटी सामने खेळले.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची कारकीर्दही खूप चांगली आणि मोठी झाली असती, पण थोड्याच वर्षात सर्व काही हातातले निसटून गेले. 1983 मध्ये कसोटी पदार्पण आणि 1986 मध्ये शेवटची कसोटी, तर 1987 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला. 9 कसोटी सामने खेळलेले लक्ष्मण यांना फक्त 26 विकेट घेता आल्या. शेवटच्या कसोटीत त्याला एकही विकेट घेता आला नाही.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा क्रिकेट विश्वातील प्रवास
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर पाहायला मिळाली असती. परंतु, काही वर्षातच त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यांनी1981-82 मध्ये दिल्ली विरूद्ध रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्यांनी 28 धावांत 7 बळी घेतले होते, या दमदार कामगिरीमुळे या लेग स्पिनरला राष्ट्रीय कीर्ती मिळाली. तेव्हा त्यांचे वय अवघे 17 वर्षेही नव्हते आणि ते 1982 – 83 मध्ये ते पाकिस्तानला गेलेल्या भारतीय संघाचे सदस्य झाले.
लक्ष्मण यांनी 17 वर्षे 118 दिवसांच्या वयात त्या हंगामाच्या शेवटी वेस्ट इंडिज विरूद्ध अँटीग्वा येथे एक कसोटी खेळली आणि सर्वात तरुण भारतीय कसोटीपटू म्हणून पदार्पण केले होते.
सन 1984-85 मध्ये मुंबईमध्ये इंग्लंड विरूद्ध कसोटी सामना खेळला होता. या कसोटी सामन्यात त्यांनी 181 धावात 12 विकेट घेत भारताला एक हाती सामना जिंकून दिला. यावेळी ते 19 वर्षांचेही नव्हते. त्या अख्ख्या मालिकेत लक्ष्मणने 23 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या भारतीय एकदिवसीय संघातही त्यांचा समावेश होता. त्यांनी मालिका विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
6️⃣ / 6️⃣ 4️⃣ and 6️⃣/ 1️⃣ 1️⃣ 7️⃣ #OnThisDay in 1984, an 18-year old Laxman Sivaramakrishnan, playing in just his second Test match, picked up a 12-wicket haul to spin India to a win over ???????????????????????????? in Mumbai ???? pic.twitter.com/uQhVPR2nty
— ICC (@ICC) December 3, 2020
लक्ष्मण यांचा अपयशाचा पारा
लक्ष्मण यांनी 1985 मध्ये श्रीलंकेत कसोटी खेळली आणि त्यात काही विशेष कामगिरी केली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली. ते 1987 च्या विश्वचषक संघांचे देखीस सदस्य होते. परंतु, त्यावेळीही त्यांच्या पदरात अपयश आले. 80 च्या दशकाच्या शेवटी त्यांच्या फलंदाजीत सुधारणा झाली होती. त्यामुळे ते तमिळनाडू संघाचा एक प्रमुख सदस्य झाले. 1987 -88 मध्ये 33 वर्षांनी तमिळनाडूने रणजी करंडक जिंकला होता. परंतु, काही वर्षातच लक्ष्मण यांचे राज्याच्या संघातील स्थानही निसटून गेले.
लक्ष्मणने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1987 मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध एकदिवसीय सामना खेळला होता आणि जानेवारी 1986 मध्ये सिडनी येथे त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्ध शेवटची कसोटी खेळली. यामध्ये त्यांना एकही बळी घेता आला नाही. त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 26 बळी घेतले. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर फक्त 15 बळी आहेत. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत एकूण 1802 धावा केल्या आणि 5 शतके आणि 3 अर्धशतकाच्या मदतीने 154 बळी घेतले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा, टी20 विश्वचषकासह ‘या’ तीन वर्ल्डकप स्पर्धांनीही गाजवले 2022 वर्ष
क्रिकेटजगताला आदरार्थी असलेल्या ‘या’ चौघांनी सरत्या वर्षात सोडले जग