---Advertisement---

मितालीसह लग्नाच्या बेडीत अडकला शार्दुल! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ‘लॉर्ड’चा विवाहसोहळा

On: सोमवार, फेब्रुवारी 27, 2023 8:27 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सोमवारी (27 फेब्रुवारी) विवाहबंधनात अडकला. मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात त्याने आपली मैत्रिण मिताली पारूळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्न समारंभाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शार्दुलने त्याची मैत्रीण मिताली पारूळकर हिच्याशी नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर 2022 टी20 विश्वचषकानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही कौटुंबिक कारणांमुळे त्यावेळी हा विवाह होऊ शकला नव्हता. या जोडप्याला गोवा येथे डेस्टिनेशन वेडिंग करायचे होती. परंतु, काही अडचणींमुळे ही योजना देखील बारगळली होती.

शार्दुल व मितालीच्या लग्नाचा हळदी समारंभ दोन दिवसांपूर्वी पार पडलेला. यामध्ये शार्दुल झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसलेला. त्यानंतर रविवारी झालेल्या संगीत समारंभासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सपत्नीक हजर राहिलेला. त्या व्यतिरिक्त भारताचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर, श्रेयस अय्यर व युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री यांनी हजेरी लावली होती.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1630201777739149315?t=DKQKDKAsswM2l_ILKgxnKg&s=19

 

मुंबई नजीकच्या एका ठिकाणी हा लग्न समारंभ पार पडला. या लग्नासाठी 250 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. हा लग्न समारंभ मराठी पद्धतीने पार पडला. यामध्ये मिताली लाल ड्रेसमध्ये दिसून आली. तिने लग्न समारंभात एन्ट्री केली तो व्हिडिओ देखील व्हायरल होतोय.

(Indian Cricketer Shardul Thakur Tie Marriage Knot With Mitali Parulkar In Mumbai)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद
आयपीएलच्या महिनाभर आधीच सट्टाबाजार गरम! मुंबई-चेन्नईला पछाडत ‌’हा’ संघ खातोय भाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---