Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलच्या महिनाभर आधीच सट्टाबाजार गरम! मुंबई-चेन्नईला पछाडत ‌’हा’ संघ खातोय भाव

February 27, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: iplt20.com

Photo Courtesy: iplt20.com


जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली. त्याबरोबरच आता सट्टा बाजारात देखील आयपीएलसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एका आघाडीच्या अधिकृत बेटिंग वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‌ सध्या गतविजेता गुजरात टायटन्स यात संघावर सर्वाधिक भाव लावला जातोय.

दरवेळी आयपीएल दरम्यान सट्टेबाजांना अटक केल्याची तसेच सट्टेबाजारातील भाव काय आहेत याबाबतच्या बातम्या येत असतात. एका आघाडीच्या बेटिंग वेबसाईट ने नुकतीच आयपीएलच्या जवळपास महिनाभर आधी कोणत्या संघावर किती भाव आहे याची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार सध्या सट्टा बाजारात गतविजेता गुजरात टायटन्स यांनाच पुन्हा एकदा विजेतेपदाची पसंती दिली गेली आहे.‌ बाजारभावानुसार गुजरातच्या विजयाचा भाव 16.67 असा सांगितला जातोय. दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स यांचा 14.28 बाजारभावासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांना देखील प्रत्येकी 13.33 असा भाव मिळताना दिसतोय.

एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची यावेळी थेट आठव्या क्रमांकावर घसरण झालीये. त्यांच्यावर ‌‌‌‌10.00 असा भाव लागलेला दिसतो. आयपीएलच्या दहा संघात सर्वात कमी भाव सनरायझर्स हैदराबादला मिळतोय. त्यांचा भाव केवळ 7.70 इतकाच दिसून येतोय. याचाच सोपा अर्थ म्हणजे गुजरात संघ जिंकल्यास ‌गुंतवलेल्या रकमेच्या सहा पट रक्कम मिळेल. तर, विजयाची सर्वात कमी शक्यता असलेल्या हैदराबादच्या विजयानंतर तब्बल तेरा पट रक्कम देण्यात येईल.

आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला ‌‌‌‌‌31मार्चपासून अहमदाबाद येथे सुरुवात होईल. स्पर्धेतील सलामीचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा होणार आहे. तर, अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाईल.

(Gujarat Titans Having Lead In Beting And Satta Bazar For IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?


Next Post
kl-rahul

केएल नक्की चुकतोय कुठे? गांगुलींनी सांगितली राहुलची कमजोरी, म्हणाले...

IND vs AUS

भारताची चिंता वाढली! तिसऱ्या कसोटीतही नाही खेळू शकरणार हा महत्वाचा फलंदाज?

Team India

"आता तुम्ही कारणे नाही देऊ शकत", आयसीसी ट्रॉफीच्या दुष्काळाबाबत दिग्गजाने टोचले टीम इंडियाचे कान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143