भारतीय क्रिकेट संघाचा ३६ वर्षीय अनुभवी सलामीवीर शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. धवनने २०२१ साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर ना त्याला टी२० विश्वचषकात जागा मिळाली ना इतर कोणत्या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये त्याला खेळवले गेले. परंतु भारतीय संघातून बाहेर असलेला धवन जगप्रसिद्ध टी२० लीग आयपीएलमध्ये मात्र धुमाकूळ घालत आहे. आयपीएल २०२२मध्ये तर त्याची आग ओकत आहे, ज्यानंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात सहभागी करण्याची मागणी होत आहे.
आयपीएल २०२२नंतर (IPL 2022) लगेच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (India Tour Of South Africa) मायदेशात टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतून धवनचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशात खुद्द धवनने (Shikhar Dhawan) आपला फॉर्म आणि भारतीय संघातील जागेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
माझा अनुभव टी२० संघाच्या येऊ शकतो कामी
आपण आणखी पुढील ३ वर्षे टी२० क्रिकेट खेळू शकतो, असे धवनचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येऊ शकतो. वृत्त संस्था पीटीआयशी बोलताना धवन म्हणाला की, “मी निवडकर्त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतो. आयुष्यात असे होत राहाते. आपण त्याचा स्विकार करायला पाहिजे आणि आपण आपले काम करत राहायला पाहिजे. मी केवळ त्या गोष्टींवर लक्ष देतो, ज्या माझ्या नियंत्रणात असतात. मी मला संधी मिळाल्यास त्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असेल.”
नेहमी स्वत:मध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात असतो
“माझे लक्ष मार्गावर नसून प्रवासावर आहे. मी नेहमी एक क्रिकेटपटू म्हणून स्वत:मध्ये कशी सुधारणा करता येईल, यावर नेहमी लक्ष देत असतो. मी कधीही स्वत:वर अनावश्यक दबाव टाकत नाही. ही एक प्रक्रिया आहे, जी कधीही संपत नाही. जर मी गोष्टींचा तशा पद्धतीने विचार केला, तर मला आनंद होणार नाही. वनडे क्रिकेटमध्ये माझी सरासरी ४५.५३ इतकी आहे. मी नेहमी माझ्या खेळात सुधारणा करण्याच्या शोधात असतो. मी नेहमी विश्लेषण करत असतो की, मी कसा आणखी चांगला बनू शकतो,” असे धवनने पुढे म्हटले.
मी आणखी ३ वर्षे खेळू शकतो क्रिकेट
धवन पुढे म्हणाला की, “एक क्रिकेटर म्हणून आम्हाला नेहमी आमचे पाय जमीनीवर ठेवायचे असतात. भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नेहमी मला फिट राहावे लागेल. मी अजून कमीत कमी ३ वर्षे क्रिकेट खेळू शकतो. मी मागील काही वर्षांपासून खूप चांगली फलंदाजी करतोय. मी आशादायी आणि सकारात्मक व्यक्ती आहे. मी आता ज्याप्रकारे प्रदर्शन करतो, त्याने कोणताही मैलाचा दगड पार करू शकतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो! मोईन अलीचा ‘तो’ चौकार पडला पाच लाखाला, आता काय होणार एवढ्या पैशांचं?
‘ज्याच्या पार्टीत जास्त मजा येईल’, चाहत्याने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शास्त्रींचे भन्नाट उत्तर
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत शिवन त्यागीचा सनसनाटी विजय