‘भारतात जास्त कौतुक विराट आणि रोहितचेच झाले, पण धवन फिट असल्यावर…’, माजी प्रशिक्षकांचे मोठे विधान

'भारतात जास्त कौतुक विराट आणि रोहितचेच झाले, पण धवन फिट असल्यावर...', माजी प्रशिक्षकांचे मोठे विधान

पंजाब किंग्जचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सोमवारी (२५ एप्रिल) जबरदस्त प्रदर्शन केले. धवनच्या ८८ धावांच्या योगदानामुळे पंजाबने मोठी धावसंख्या उभी केली आणि शेवटी विजय देखील मिळवला. याच पार्श्वभूमीवर धवनचे सर्वत्र कौतुक केले गेले. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या मते धवन या कौतुकास पूर्णपणे पात्र आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिळालेल्या प्रसिद्धीप्रमाणे धवनदेखील यासाठी पात्र आहे.

शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने सुरुवातीच्या ९ सामन्यात ३८.३८च्या सरासरीने आणि १२६.३४च्या स्ट्राईक रेटसह ३०७ धावा केल्या आहेत. सीएसकेविरुद्धच्या सामन्यात धवनने ५९ चेंडूत नाबाद ८८ धावा केल्या. त्याच्या या महत्वाच्या योगदानामुळे पंजाबला ६ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावांपर्यंत मजल मारता आली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याबद्दल बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “मी त्याला गन प्लेअर म्हणतो. कारण, या देशात जास्तकरून रोहित आणि विराटचे कौतुक होत असते. परंतु तो फिट असल्यावर त्या दोघांमधील एक चांगला खेळाडू ठरला आहे. तो त्याला मिळणाऱ्या सर्व कौतुकास पात्र आहे, जे त्याला मिळत आहे. त्याने आयपीएलमध्ये ६००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.”

शास्त्रींसोबत यावेळी माजी अष्टपैलू इरफान पठाण उपस्थित होता. इरफानने यावेळी पंजाब किंग्जचा इतर फलंदाजांकडून धवनला मिळणाऱ्या सहकार्याचे कौतुक केले. तो म्हणाला की, “पंजाब किंग्ज या हंगामात पॉवरप्लेमधील सर्वात विस्फोटक संघ राहिला आहे. यामागचे कारण आहे शिखर धवनची फलंदाजी. आयपीएल २०२२ मध्ये त्यांचा दृष्टीकोन खूप सरळ राहिला आहे. धवनच्या आजूबाजूने त्यांचा डाव उभा करायचा. त्यांना शेवटपर्यंत खेळायचे असते. धवन त्याचा खेळ खेळत राहतो, पण बाकीचे फलंदाज ते सहकार्य देतात शेवटच्या षटकांमध्ये आक्रमकता दाखवून धावसंख्या उभी करत आहेत.”

यावेळी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज केविन पीटरसन देखील चर्चेत सहभागी होता. त्याने देखील धवनचे कौतुक केले. पंजाबने या सामन्यात सीएसकेला ११ धावांनी धूळ चारली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने आपल्या आईला गरिबीतून बाहेर काढण्याचे वचन दिले होते’, विंडीजच्या दिग्गजाने सांगितली पॉवेलची भावूक कहाणी

भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा

मुंबई खेळतीये मोठा डाव, ‘या’ घातक गोलंदाजाला संघात परत बोलावले; आता उरलेले ६ सामने जिंकण्याचा निर्धार

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.