ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. चाहत्यांसाठी तो नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच आता गुरुवारी (२८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत वॉर्नर आणि त्यांचे कुटुंब दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ४ विकेट्सने जिंकला होता.
केकेआरविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवल्यानंतर डेविड वॉर्नर (David Warner) खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे. याच आनंदात त्याने पत्नी कँडी आणि त्याच्या मुलींसोबत डान्स केला आहे. स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ त्याच्या मुली आणि पत्नी सुरुवातीला डान्स करतात आणि नंतर वॉर्नरचे आगमन होते. चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “जेव्हा आम्ही अजून एक सामना जिंकतो, तेव्हा आम्ही काय करतो”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिल्ली आणि कोलकाता (DC vs KKR) संघातील या सामन्याचा विचार केला, तर दिल्लीने एक षटक शिल्लक असताना विजय मिळवला. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआरचा संघ कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि ९ विकेट्सच्या नुकसानावर १४६ धावांपर्यंत कसाबसा पोहोचला. कुलदीप ४, तर वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमाननेही ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा वेगवान गोलंदाज उमेश यादवने जबरदस्त प्रदर्शन करत तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. परंतु अक्षर पटेल (२४) आणि रोवमन पॉवेल (३३) यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे दिल्लीने चार विकेट्स राखून सामना नावावर केला. तत्पूर्वी सलामीवीर वॉर्रनने २६ चेंडूत ४२ धावा करून संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता, पण पृथ्वी शॉ मात्र शून्य धावेवर बाद झाला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा