भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील चौथा सामना येत्या शनिवारी (दि. 12 ऑगस्ट) फ्लोरिडा येथील लॉडरहिलमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ मियामी येथे पोहोचला. यावेळी भारतीय संघाच्या खेळाडूंचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओत खेळाडू विमानतळावर मजा-मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय संघाच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
खरं तर, बीसीसीआयने एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केला आहे. यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू आधी विमानात दिसत आहेत. पुढे विमानतळावर पोहोचल्यानंतर शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि युझवेंद्र चहल मजेशीर अंदाजात दिसत आहेत. गिलसह तिलक आणि चहल काहीतरी खाताना दिसत आहेत. यांच्याव्यतिरिक्त आवेश खान, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन हेदेखील व्हिडिओत दिसत आहेत.
𝙏𝙤𝙪𝙘𝙝𝙙𝙤𝙬𝙣 Miami ✈️#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/SKJTbj0hgS
— BCCI (@BCCI) August 10, 2023
या व्हिडिओवर एकाने कमेंट केली की, “इज्जत वाचली पाहिजे बास, बाकी मियामीशी काय घेणंदेणं.”
Izzat bach jaye bs..baki kya lena dena Miami se#INDvsWI
— Ayaan Kaith (@KaithAyaan22) August 10, 2023
आणखी एकाने म्हटले की, “एकमेव संघ जो आपल्या बोर्डाच्या पैशांवर फरण्यासाठी आणि फोटो सेशनसाठी जातो.”
एकमेव टीम जो अपने बोर्ड के पैसोसे घुमने, फोटो सेशन करणे जाती है
— DNYANESHWAR PAWAR (@dnyana_official) August 10, 2023
मालिकेत भारत पिछाडीवर
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील 3 सामन्यांनंतर भारतीय संघ अजूनही 1-2ने पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजने सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने तिसरा टी20 सामना 7 विकेट्सने जिंकला. आता सामन्यातील चौथा सामना 12 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने लॉडरहिल येथे खेळले जाणार आहेत.
मालिकेतील सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांविषयी बोलायचं झालं, तर पदार्पणवीर तिलक वर्मा (Tilak Varma) याने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात सर्वाधिक 139 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी निकोलस पूरन आहे. पूरनने 3 सामन्यात 128 धावा केल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी असलेल्या विंडीज कर्णधार रोवमन पॉवेल याने 3 सामन्यात 109 धावा, तर सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी असून त्याने 3 सामन्यात 105 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याला खास कामगिरी करता आली नाहीये. 3 सामन्यात त्याने फक्त 63 धावा केल्या आहेत. तो यादीत सहाव्या स्थानी आहे. (indian cricketer team reached miami before 4th t20 match against west indies )
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या भूमीत तळपली पृथ्वी शॉची बॅट! वादळी द्विशतक ठोकत उद्ध्वस्त केले मोठे रेकॉर्ड्स
मोठी बातमी! विश्वचषकात खेळण्यासाठी विलियम्सन भारतात येणार? हेड कोचच्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष