Virat Kohli And Rohit Sharma Video: दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर पडला आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला. यानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही तुटले. भारतीय संघ आजपर्यंत कधीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकला नाहीये. या कसोटी सामन्यात पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ आयसीसी डब्ल्यूटीसी 2023-25 पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी घसरला.
या पराभवामुळे भारतीय संघासह अनेक क्रिकेटप्रेमीही निराश झाले. अशात विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli And Rohit Sharma Video) यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या वेदना कमी करण्याचे काम करू शकतो.
रोहितने थोपटली विराटची पाठ
भारतीय संघाने पाच दिवसांच्या सामन्यात तिसऱ्या दिवशीच हार मानली. दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या 131 धावांवर संपुष्टात आला. या डावात विराट कोहली 76 धावा (Virat Kohli 76 Runs) करून बाद झाला. विराटच्या रूपात भारतीय संघाने आपली अखेरची विकेट गमावली. तसेच, जेव्हा विराट बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये परत जात होता, तेव्हा रोहित शर्मा तिथेच उभा होता. विराटला येताना पाहून रोहितने त्याची पाठ थोपटत विराटच्या खेळीचे कौतुक केले.
Rohit Sharma appreciated Virat Kohli 🫶❤️ pic.twitter.com/QGrb0VSRFq
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) December 29, 2023
रोहित शर्मासाठी खराब सामना
खरं तर, विराटला चांगल्या खेळीसाठी त्याची पाठ थोपटणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी हा सामना खूपच खराब ठरला. रोहितने पहिल्या डावात 5 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर रोहित दुसऱ्या डावात मोठी खेळी करेल, अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा होती, पण तो कागिसो रबाडा याच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला.
भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या. भारताने दुसऱ्या डावात 131 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. यावेळी भारताकडून विराटने 76, तर शुबमन गिलने 26 धावा केल्या. या दोघांना सोडून इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही. आता 3 ते 7 जानेवारीदरम्यान केपटाऊन येथे पार पडणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजय मिळवून मालिका 1-1ने बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. (indian cricketer virat kohli and rohit sharma will reduce the pain of centurion shameful defeat against south africa video viral)
हेही वाचा-
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाच्या खेळपट्टीवर उथरला अंबाती रायुडू, ‘या’ पक्षात केला प्रवेश
स्मिथ देत होता त्रास, झटक्यात मागे वळून बाबरने दाखवली बॅट, पठ्ठ्याने हातच जोडले; पाहा Video