हॅमिल्टन। भारताला आज (31 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे.
या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत होता. याबरोबरच रोहित हा त्याचा आज 200वा वन-डे सामना खेळत होता. यामुळे तो भारताकडून 200वन-डे सामन्याचा टप्पा गाठणार 14वा आणि जगातील 79वा खेळाडू ठरला.
रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरूद्दीन, सौरव गांगुली, युवराज सिंग, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, सुरेश रैना, कपिल देव आणि विराट कोहली या 13 भारतीय खेळाडूंनी 200वन-डे सामन्यांचा टप्पा पार केला आहे.
रोहित आणि विराट त्यांच्या 200वा सामन्यात पराभूत झाले आहेत. तर धोनी आणि अनिल कुंबळे हे त्यांच्या 200व्या सामन्यात यशस्वी ठरले होते.
धोनी आणि कुंबळे यांनी त्यांच्या 200व्या सामन्यात सामनावीराचे पुरस्कारही पटकावले आहेत.
2012मध्ये एडलेड येथे सीबी मालिकेतील भारताचा श्रीलंके विरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला होता. यामध्ये धोनीने नाबाद 58 धावा करत भारताला पराभवापासून रोखले होते. हा त्याचा 200 वा वनडे सामना होता. त्याचबरोबर यष्टीरक्षणातही अप्रतिम कामगिरी केल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा तो 200 वन-डे सामने खेळणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला होता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2000मध्ये कुंबळे यांनी केनिया विरुद्ध त्यांचा 200वा वन-डे सामना खेळला होता. यामध्ये त्यांनी 10 षटकात 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–पदार्पणाच्या सामन्यातच शुबमन गिलने विराट कोहलीला टाकले मागे
–दुखापतीतून सावरत असलेला पृथ्वी शॉ म्हणतो, ‘अपना टाईम आयेगा’…
–केएल राहुलचे विश्वचषकातील स्थान धोक्यात…?