---Advertisement---

भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा

On: शनिवार, एप्रिल 25, 2020 6:06 PM
---Advertisement---

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. त्यासाठी ते आवश्यक ती मेहनतही करतात. परंतु काहीवेळा खूप मेहनत करूनदेखील व्यक्तीला हवा तो निकाल मिळत नाही, ज्याची त्याला अपेक्षा असते.

अशावेळी सामान्य व्यक्तीपासून बरेच मोठ-मोठे सेलिब्रिटीज अंधश्रद्धेचा (Superstition) मार्ग अवलंबतात. अशाच प्रकारे आज आपण या लेखात ते भारतीय खेळाडू पाहणार आहोत, ज्यांनी अनेक चित्रविचित्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला आहे. कारण त्यांना असे वाटते की, असे केल्याने ते खेळात चांगली कामगिरी करू शकतात.

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे भारतीय खेळाडू-

सचिन तेंडुलकर-

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या खेळाडूचे. सचिन जेव्हाही फलंदाजीसाठी तयार होत होता, तेव्हा तो सर्वप्रथम आपल्या डाव्या पायात पॅड घालत होता. याव्यतिरिक्त सचिन आपल्या क्रिकेट कीट बॅगमध्ये साई बाबांचा फोटोही ठेवत होता. सचिनचा असा विश्वास होता की, हे सर्व केल्याने त्याला गुडलक मिळेल.

राहुल द्रविड-

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात विश्वासू खेळाडू म्हणजेच ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड (Rahul Dravid) आपल्या सर्वोत्तम फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु राहुलचादेखील त्या खेळाडूंमध्ये समावेश आहे, जे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. राहुल जेव्हाही फलंदाजी करण्यासाठी तयार होत होता, तेव्हा तो आपल्या उजव्या मांडीचा पॅड पहिला घालत होता. याव्यतिरिक्त राहुल कोणत्याही मालिकेदरम्यान आपली बॅट बदल नव्हता.

विराट कोहली-

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli)  स्वत:ला अंधश्रद्धेपासून दूर ठेवू शकला नाही. विराट आपल्या प्रत्यके सामन्यात आपले आवडते बॅटिंग ग्लोव्हज घालत होता आणि त्यानंतरच तो फलंदाजी करत होता. तरीही विराटची ही अंधश्रद्धा फार काळ टिकली नाही. अंधश्रद्धेपेक्षा क्रिकेटमध्ये प्रतिभेची अधिक आवश्यकता असते हे त्याला समजले. यानंतर त्याने आपले आवडते ग्लोव्हज पुन्हा घातले नाही.

एमएस धोनी-

भारतीय संघाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू आणि यशस्वी कर्णधारांपैकी एक असणाऱ्या एमएस धोनीचाही (MS Dhoni) या यादीत समावेश आहे.  धोनी जेव्हाही खेळपट्टीवर फलंदाजी करतो, तेव्हा तो चेंडूचा सामना करताना आपल्या नाकाला अंगठ्याने हात लावतो. तसेच तो स्ट्राईक घेण्यापूर्वी आपले ग्लोव्हज पुन्हा फीट करतो.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टीम इंडियाचा पहिला व शंभरावा टी२० सामना खेळणारे दोन दिग्गज खेळाड

-क्रिकेटपटूंना जानेवारीपासून एकही रुपया मिळाला नाही, घर चालवणेही झाले कठीण

-१४९० क्रिकेटपटूंसोबत सचिन खेळला होता आंततरराष्ट्रीय क्रिकेट, कसं ते घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---