टीम इंडियाचा पहिला व शंभरावा टी२० सामना खेळणारे दोन दिग्गज खेळाडू

भारतीय संघाने 27 जून 2018रोजी आयर्लंडविरुद्ध  100 वा ऐतिहासिक टी20 सामना खेळला होता. या सामन्यात भारताकडून दोन असे खेळाडू खेळले जे 14 वर्षांपुर्वी भारताकडून पहिला टी20 सामना खेळले होते.

भारताने पहिला टी20 सामना जवळ जवळ 14 वर्षांपूर्वी म्हणजे 1 डिसेंबर 2006 ला खेळला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. सुरवातीला टी20 क्रिकेटला विरोध केलेल्या भारताने या 12 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये बरीच प्रगती केली आहे.

2. सुरेश रैना: भारताचा टी20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाचा हा 14 वर्षांचा प्रवास चांगला झाला आहे. तो भारताकडून सर्वाधिक टी 20 सामने खेळणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तसेच भारताकडून टी 20मध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्येही तो चौथ्या क्रमांकावर आहे.

त्याने 1 डिसेंबर 2006 रोजी झालेल्या भारताच्या पहिल्या टी२० सामन्यात नाबाद 3 धावा केल्या. तर 27 जून 2018 रोजी झालेल्या टीम इंडियाच्या 100व्या सामन्यात त्याने 10 धावा केल्या होत्या.

1. एमएस धोनी: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी भारताच्या टी20 क्रिकेटचा चालता बोलता इतिहास आहे. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत.

भारताकडून 98 सामने खेळणाऱ्या धोनीच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याचाही विक्रम आहे. त्याने आत्तापर्यंत भारताकडून 98 सामने खेळले असुन त्यातील 72 सामन्यात भारताचे कर्णधारपद संभाळले आहे.

तसेच कर्णधार म्हणून पहिलाच टी20 विश्वचषक जिंकत भारताला टी 20 क्रिकेटमध्ये पहिली ओळखही धोनीने मिळवून दिली.

त्याने 1 डिसेंबर 2006 रोजी झालेल्या भारताच्या पहिल्या टी२० सामन्यात नाबाद 0 धावा केल्या. तर 27 जून 2018 रोजी झालेल्या टीम इंडियाच्या 100व्या सामन्यात त्याने 11 धावा केल्या होत्या.

२००६ला पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघातून हे ११ खेळाडू खेळले होते-

विरेंद्र सेहवाग (कर्णधार), सचिन तेंडूलकर, दिनेश मोंगिया, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, झहीर खान, अजित आगरकर आणि एस श्रीशांत

२०१८ला टीम इंडियाच्या १००व्या टी२० सामन्यात खेळलेले ११ खेळाडू-

रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

ट्रेंडिंग घडामोडी-

-तब्बल ८ वर्षांनी सचिननी ओपन केली होती ती खास शाॅंपेन, कारणही होते तसेच खास

-भारतीय क्रिकेटपटू आणि काऊंटी क्रिकेटचे नाते काही खास, पहा कोण कोण खेळलंय आजपर्यंत काऊंटी

-धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.