---Advertisement---

फिरकीचा जादूगार गेला! आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 9:46 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न याने शुक्रवारी (४ मार्च) अखेरचा श्वास घेतला. हार्ट अटॅकमुळे थायलंड येथे त्याचे आकस्मित निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता. आपल्या फिरकीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणाऱ्या वॉर्नला क्रिकेटविश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी देखील त्याच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत म्हटले,

‘माझ्याकडे शब्द नाहीत. अत्यंत दुखद बातमी आहे. आज आपण खेळाचा एक दिग्गज आणि विजेता खेळाडू गमावला आहे. अजूनही विश्वास बसत नाही.’

रोहितसह भारतीय संघाचा माजी कर्णधार व प्रमुख फलंदाज विराट कोहलीने ट्विट करत वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले,

‘आयुष्य हे खूप अनपेक्षित असते. आपल्या खेळाचा एक दिग्गज आणि वैयक्तिकरित्या मी ओळखत असलेला एक असाधारण माणूस गमावला आहे. चेंडू वळवणारा सर्वात मोठा कलाकार’

शेन वॉर्न याच्या नेतृत्वात आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा ट्विट करत म्हणाला,

‘ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. आपल्या खेळाचा एक महान व्यक्ती. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.’

भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने श्रद्धांजली वाहताना लिहिले,

‘प्रेक्षकांना मैदानाकडे खेचून आणणारा, फिरकीचा जादूगार, आयपीएल विजेता पहिला कर्णधार. तू कायम आठवणीत राहशील.’

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले,

‘धक्कादायक… तुझी आठवण येईल वॉर्नी. तू आजूबाजूला असताना एकही खराब क्षण गेला नाही. भारतीयांच्या मनात तुझ्याबद्दल नेहमी आदर राहील.’

याव्यतिरिक्त भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, आकाश चोप्रा इत्यादी भारतीय खेळाडूंनी देखील त्याला श्रद्धांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन, क्रिकेटविश्व हादरले (mahasports.in)

बिली बाऊडेन यांनी खास शैलीत बोट उंचावले अन् शेन वॉर्नचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले (mahasports.in)

बरोबर २९ वर्षांपूर्वी २३ वर्षांच्या शेन वाॅर्नने टाकला होता ‘बाॅल ऑफ द सेंच्युरी’, पाहा तो खतरनाक चेंडू (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---