भारत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारत देश जवळपास दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठा उत्साह दिसून येतो. त्याचबरोबर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमांतून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत असतात. भारताच्या क्रिकेटपटूंनीही स्वातंत्र्यदिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश लिहिले आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत ट्वीट केले आहे की, ‘भारत नेहमी सर्वोच्च असेल. मी नेहमीच अभिमानाने हेल्मेटवर झेंडा लावला आहे. तो नेहमी मला आठवण करून देतो की, मी मैदानावर का आहे. जगभरातील भारतीय लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.’
https://twitter.com/sachin_rt/status/1426750058150600706
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग यांनी स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून ट्विट केले आणि लिहिले की, “आज ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, आम्ही त्या लोकांच्या संघर्षाची आठवण करत आहोत, जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, स्वातंत्र्य मौल्यवान आहे, त्याचा सन्मान करा आणि आनंद घ्या.”
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1426750488062533634
भारतीय क्रिकेट संघाचे माजी सदस्य व्यंकटेश प्रसाद यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा वेगळ्या पद्धतीने दिल्या. या निमित्ताने त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात प्रसाद ‘वंदे मातरम्’ गाताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “स्वातंत्र्य आपल्या मनात आहे, विश्वास आपल्या शब्दांमध्ये आहे, अभिमान हा आपला आत्मा आहे, चला या शुभ प्रसंगी राष्ट्राला सलाम करूया.”
https://twitter.com/venkateshprasad/status/1426761340685721601
वीरेंद्र सेहवागनेही देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्याने ट्विट करून लिहिले की, “नका विचारू जगाला की, माझी कथा काय आहे, आपली ओळख फक्त हिंदुस्थानी आहे. हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है…जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए!! सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.”
https://twitter.com/virendersehwag/status/1426740482743275520
https://twitter.com/Sundarwashi5/status/1426925185035239432
https://twitter.com/yuzi_chahal/status/1426825565252640773
https://twitter.com/SDhawan25/status/1426803661552832514
https://twitter.com/ShreyasIyer15/status/1426794527432400901
https://twitter.com/DineshKarthik/status/1426793009165737985
https://twitter.com/imkuldeep18/status/1426788892137517061
https://twitter.com/therealkapildev/status/1426784881049169922
https://twitter.com/RealShubmanGill/status/1426783719558320134
https://twitter.com/ImIshant/status/1426635751324753922
क्रिकेटपटूंशिवाय आयपीएल फ्रँचायझींनीही स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/mipaltan/status/1426612083131658242
https://twitter.com/ChennaiIPL/status/1426741090611195910
https://twitter.com/KKRiders/status/1426612082154393610
https://twitter.com/RCBTweets/status/1426732878466101257
https://twitter.com/rajasthanroyals/status/1426740427890196480
https://twitter.com/DelhiCapitals/status/1426747980124667904
https://twitter.com/SunRisers/status/1426759279147511814
https://twitter.com/BCCI/status/1426845948634824706
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे भारतीय संघाने लंडनमध्ये तिरंगा फडकवत आणि राष्ट्रगीत गात स्वातंत्र्यदिन साजरा केला.






