---Advertisement---

भारतीय क्रिकेटर्सचे सुमार क्षेत्ररक्षण; एक-दोन नव्हे, तब्बल तीनवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला जीवदान

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 4:00 PM
---Advertisement---

कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही संघाला चांगली कामगिरी करावी लागते. ऍडलेडच्या मैदानावर गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट राहिले. भारतीय क्रिकेटपटूंनी एक-दोन नव्हे, तर तब्बल तीनवेळा एकाच ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे झेल सोडले. हा फलंदाज म्हणजे, मार्नस लॅब्यूशाने.

पहिले जीवदान
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या ७४ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापुढे २४५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी अष्टपैलू मार्नस लॅब्यूशाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. सामन्याच्या सुरुवातीच्या काही षटकात फलंदाजी करत असताना त्याला पहिले जीवदान मिळाले. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने मागील बाजूला शॉट मारला. यष्टीमागे यष्टीरक्षक वृद्धीमान साहासह दोन खेळाडू उपस्थित होते. तरीही तो झेल घेण्यात त्यांना यश आले नाही आणि चेंडू सीमारेषेच्या पार गेला.

https://twitter.com/FlashCric/status/1339808306076864512?s=20

दुसरे जीवदान
त्यानंतर बुमराहच्या छोट्याशा चुकीमुळे लॅब्यूशाने दुसऱ्यांदा विकेट हुकली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी डावातील १८वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून घेण्याच्या लॅब्यूशानेने जोरदार शॉट मारला. पण सीमारेषेजवळ पुर्वीपासूनच बुमराह सावध होता. त्यामुळे आता भारताला विकेट मिळेल, असे सर्वांना वाटू लागले. तेवढ्यात बुमराहने तो साधारण झेल सोडला आणि लॅब्यूशानेला दुसरे जीवदान मिळाले.

https://twitter.com/cricketcomau/status/1339812878270918657?s=20

तिसरे जीवदान
एवढ्यावरच लॅब्यूशानेचा झेल सोडण्याचा सिलसिला थांबला नाही, तर पुन्हा डावातील २३व्या षटकात युवा भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने लॅब्यूशानेचा झेल सोडला. कर्णधार विराट कोहलीने बुमराहकडे डावातील २३वे षटक सोपवले होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर लॅब्यूशानेने साधारण शॉट मारला आणि चेंडू पृथ्वी शॉ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या दिशेने गेला. तो चेंडू पकडण्यासाठी शॉने उलट्या दिशेने धावही घेतली. पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. अशाप्रकारे तिसऱ्यांदा लॅब्यूशानेला जीवदान मिळाले.

https://twitter.com/cricketcomau/status/1339827336875704320?s=20

अखेर यादवने घेतली विकेट
भारतीय क्रिकेटपटूंच्या वाईट क्षेत्ररक्षणामुळे तीनवेळा बाद होण्यापासून वाचलेला लॅब्यूशाने शेवटी ५४व्या षटकात बाद झाला. वेगवान गोलंदाज उमेश यादवने त्याला पायचीत केले. त्यामुळे ७ चौकारांच्या मदतीने ४७ धावा करत लॅब्यूशाने पव्हेलियनला परतला.

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND Test Live : विदर्भ एक्स्प्रेस सुसाट! उमेश यादवने पटकविले एकाच षटकात दोन बळी, ऑस्ट्रेलिया ७ बाद ११७

‘उडता कोहली’! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल

आर अश्विनच्या फिरकीपुढे गोंधळला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू, झेल दिला थेट हातात; पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---