भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये अनेक नवे चेहेरे भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहेत. कारण भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्याने अनेक अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी अनुपलब्ध आहे. त्याचमुळे त्यांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात संधी दिली आहे. दरम्यान, हा संघ श्रीलंकेत क्वारंटाईन कालावधी संपल्याच्या आनंदात पूल पार्टी करताना दिसला आहे.
क्वारंटाईन कालावधी झाला पूर्ण
भारतीय संघ २८ जून रोजी श्रीलंकेमध्ये पोहचला होता. त्यापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईमध्ये २ आठवडे क्वारंटाईन होते. यादरम्यान त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन जीममध्ये व्यायाम करण्याची परवानगी दिली होती. या २ आठवड्यांच्या कालावधीनंतर श्रीलंकेत पोहचल्यानंतरही खेळाडूंना ३ दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते.
त्यामुळे आता भारतीय खेळाडूंनी हा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असल्याने सर्व खेळाडू एकत्र आले. भारतीय खेळाडूंनी क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर स्विंमिंग पूलमध्ये डुंबत आनंद घेतला आहे. या दरम्यानचा फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच अनेक खेळाडूंनीही या पूल पार्टीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बीसीसीआयने हा फोटो शेअर करताना कॅप्शन दिले आहे आहे की ‘क्वारंटाईमधून बाहेर येण्याचा आनंद. सर्वजण खूश आहे. या क्षणांचा व्हिडिओ लवकरच भेटीला येईल.’ बीसीसीआयच्या या कॅप्शनवरुन एक गोष्ट समजते की भारतीय खेळाडूंच्या या पूल पार्टीचा व्हिडिओ देखील सर्वांसमोर येणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1410574074212982784
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते की पूल पार्टीमध्ये प्रभारी कर्णधार शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, पृथ्वी शॉ, मनिष पांडे, कुलदीप यादव, संजू सॅमसन अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंसह काही युवा खेळाडूही आहेत.
https://twitter.com/yuzi_chahal/status/1410576826494185475
https://twitter.com/surya_14kumar/status/1410591426325336068
युवा खेळाडूंचा संघात समावेश
श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, देवदत्त पडीक्कल, के गाॅथम, चेतन सकरिया, वरुण चक्रवर्ती अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी असणार आहे. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शिखर धवन सांभाळणार असून भूवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. या संघाचे प्रशिक्षकपद दिग्गज राहुल द्रविड सांभाळणार आहे.
असा होणार आहे श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
उर्वरित आयपीएल २०२१ चालू होण्यापूर्वी आरसीबीचा मोठा निर्णय; संघात झाली नव्या व्यक्तीची एन्ट्री
सॅम करनने ५ विकेट्स घेत केली श्रीलंकेची वाताहत, मोठा भाऊ टॉमप्रमाणे केली ‘ही’ कमाल