---Advertisement---

मोठ्या मनाची टीम इंडिया! वेस्ट इंडीजमध्ये दाखवलेल्या औदार्याने होतेय कौतुक , व्हिडिओ पाहाच

On: शुक्रवार, जुलै 7, 2023 3:31 PM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे व पाच टी20 सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी मालिका सुरू होण्यासाठी चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, भारतीय संघ वेस्ट इंडीज येथे पोहोचल्यानंतर बार्बाडोस येथे सराव करत आहे. भारतीय संघ आपला पहिला कसोटी सामना डॉमीनिका येथे खेळेल. तिकडे रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाने बार्बाडोस येथे भारतीय संघाला सराव देणाऱ्या नेट बॉलर्सचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.

भारतीय संघ मागील आठवड्यात बार्बाडोस येथे पोहोचला. तेव्हापासून भारतीय संघ या मैदानावर सराव करताना दिसतोय. याच मैदानावर भारताने आपला पहिला सराव सामना खेळला. यामध्ये सहा स्थानिक खेळाडू देखील सहभागी झालेले.

याच खेळाडूंचे आभार व्यक्त करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी या गोलंदाजांना काही वस्तू दिल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपली बॅट या खेळाडूला गिफ्ट केली. हे खेळाडू आम्हाला पहिल्या दिवसापासून मदत करत होते असे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने खास स्वाक्षरी केलेल्या जर्सी भेट म्हणून दिल्या. तसेच ईशान किशन व कर्णधार रोहित शर्मा यांनी या खेळाडूंच्या सदिच्छा भेट घेतल्या. याच गोलंदाजांना भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये देखील आमंत्रित केले होते. रविचंद्रन अश्विन व यशस्वी जयस्वाल सोबत गप्पा मारताना दिसले. या खेळाडूने देखील भारतीय खेळाडूंच्या या मोठेपणाचे कौतुक केलेले आहे.

(Indian Cricketers Gift To Net Bowlers In Barbados Siraj And Virat Ahead)

महत्वाच्या बातम्या –
आशिया कप-वर्ल्डकपआधीच रंगणार भारत-पाकिस्तानची रंगीत तालीम! या दिवशी रंगणार द्वंद्व
अफलातून! संघाने विश्वचषकात एन्ट्री करण्याची संधी गमावली, पण पठ्ठ्याने 23व्या वर्षी शतक ठोकत घडवला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---