---Advertisement---

‘बिर्याणी, दो दिन बाद’, कसोटीत विकेट्सचे ‘द्विशतक’ करणाऱ्या शमीची गुरुजींनी घेतली फिरकी

On: बुधवार, डिसेंबर 29, 2021 2:32 PM
Mohammad-Shami-Ravi-Shastri
---Advertisement---

रविवारपासून (२६ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ३२७ धावा करण्यात करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका संघाचा डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमी याने ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. या कामगिरीनंतर अनेक दिग्गजांनी ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.

मोहम्मद शमीने हा कारनामा दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) केला आहे. असा कारनामा करणारा तो पाचवा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या या कामगिरीनंतर माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मजेशीर ट्विट करत लिहिले की, “बंगालचा सुल्तान शाब्बास, पाहून खूप मजा आली. आता दोन दिवसांनंतर बिर्याणी. मेहनतीचं फळ हे गोड असतं.”

तर रोहित शर्माने देखील ट्विट करत त्याचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले की, दुहेरी शतक नेहमीच एक खास आकडा असतो. तर नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केलेल्या हरभजन सिंगने देखील त्याचे ट्विट करत कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, “खूप चांगली कामगिरी केली मोहम्मद शमी.”

https://twitter.com/harbhajan_singh/status/1475850720284798984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1475850720284798984%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Findia-legends-celebrate-mohammed-shami-sensational-show-in-centurion-as-pacer-completes-200-wicket-milestone-in-tests-hindi-2676855

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1475852420794052609?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1475852420794052609%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Findia-legends-celebrate-mohammed-shami-sensational-show-in-centurion-as-pacer-completes-200-wicket-milestone-in-tests-hindi-2676855

https://twitter.com/VVSLaxman281/status/1475852281698390019?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1475852281698390019%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Findia-legends-celebrate-mohammed-shami-sensational-show-in-centurion-as-pacer-completes-200-wicket-milestone-in-tests-hindi-2676855

https://twitter.com/MdShami11/status/1475878059618279425?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1475878059618279425%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Findia-legends-celebrate-mohammed-shami-sensational-show-in-centurion-as-pacer-completes-200-wicket-milestone-in-tests-hindi-2676855

https://twitter.com/ImRo45/status/1475880059739070473?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1475880059739070473%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Findia-legends-celebrate-mohammed-shami-sensational-show-in-centurion-as-pacer-completes-200-wicket-milestone-in-tests-hindi-2676855

२०० गडी बाद करण्याचा पराक्रम करणारा मोहम्मद शमी तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने हा कारनामा कारकिर्दीतील ५५ व्या कसोटी सामन्यात केला आहे. माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी हा कारनामा ५०व्या कसोटी सामन्यात केला होता.

महत्वाच्या बातम्या :

फँटॅस्टिक पंत! बवुमाचा झेल टिपताच रिषभने रचला इतिहास

“आपण ऑस्ट्रेलियाच्या आसपासही नाही”; संघसहकाऱ्याचीच इंग्लंड संघावर जहरी टीका

हे नक्की पाहा :

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---