दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३२७ धावांचा डोंगर उभारला होता. तर प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने ४४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. या कामगिरीनंतर मोहम्मद शमीने (mohammad shami) आपल्या वडिलांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद शमीने माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, “मी आज जे काही आहे, ते माझ्या वडीलांमुळे आहे. मी अशा भागातून आहे जिथे आजही क्रिकेटसाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीयेत. पाच गडी बाद करणं ही एक विशेष गोष्ट आहे, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मला ॲकेडमीत नेण्यासाठी माझे वडील ३० कि.मी. सायकल चालवत असे. मला अजूनही ते बलिदान आठवते.”(Mohammad shami gets emotional after taking 5 wickets)
मोहम्मद शमीचा जन्म अमरोहाच्या एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला होता. त्याला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. एकदा त्याच्या वडिलांनी त्याला वेगवान गोलंदाजी करताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी खुश होऊन त्याला मुरादाबाद क्रिकेट ॲकेडमीमध्ये पाठवले. तिथे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी त्याचे वेगवान चेंडू पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी त्याला युपी १९ वर्षाखालील संघाच्या निवड चाचणीसाठी पाठवले. त्यावेळी त्याची निवड झाली नव्हती. त्यामुळे बदरुद्दीन सिद्दीकी यांनी त्याला कोलकाताला पाठवले होते.
हेही वाचा- वयाची तिशी ओलाडली तरी भेदकता तीच! बॉक्सिंग डे कसोटीत ‘पंचक’ घेत शमी याबाबतीत बनला नंबर १
कोलकाताला पोहचल्यानंतर मोहम्मद शमीने आणखी जास्त मेहनत घेतली. तो डलहौसी क्लबसोबत खेळू लागला आणि तिथे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने त्याला गोलंदाजी करताना पाहिले. शमीला मोहन बागान क्लबमध्ये पाठवण्यात आले जेथे सौरव गांगुलीने त्याची गोलंदाजी पाहिली. दादांनी शमीची प्रतिभा ओळखली आणि निवडकर्त्यांना शमीवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले. यानंतर शमीने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि आज या वेगवान गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा इतिहास रचला आहे.
महत्वाच्या बातम्या :
फँटॅस्टिक पंत! बवुमाचा झेल टिपताच रिषभने रचला इतिहास
“आपण ऑस्ट्रेलियाच्या आसपासही नाही”; संघसहकाऱ्याचीच इंग्लंड संघावर जहरी टीका
हे नक्की पाहा: