ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (austrelia vs england) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार विजय मिळवला होता. आता सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने १ डाव आणि १४ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने कसोटी मालिकेत ३-० ची विजयी आघाडी घेतली. या पराभवानंतर इंग्लंड संघातील खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान इंग्लंड संघातील खेळाडूने आपल्याच संघांच्या कामगिरीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
सुरुवातीला असे वाटले होते की, या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. परंतु, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंड संघाला बॅकफुटवर ठेवले आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी दोन्ही क्षेत्रात इंग्लंडचे खेळाडू साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. दरम्यान इंग्लंड संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोइन अली याने इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाच्या आसपासही नाहीये असे म्हटले आहे. (Moeen ali statement)
मोइन अलीने म्हटले की, “ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंड संघापेक्षा खूप पुढे आहे. आपण तीनही सामन्यात त्यांच्यापेक्षा खूप मागे राहिलो आहोत. मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये इतके अंतर नव्हते. मात्र, मालिकेतील तीनही सामने गमावल्यानंतर हे अंतर खूप वाढले आहे. मला तर आठवतही नाही की, आपण या मालिकेतील किती सत्र आमच्या नावावर केली आहेत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे अनुभव, तंत्र आणि मेहनत करणं गरजेचं आहे. मी असे म्हणत नाही की, आम्ही कठोर परिश्रम करत नाही. परंतु, मला असे वाटत नाही की आम्ही बर्याचदा योग्य गोष्टींवर काम करतो.”(Moeen ali admits england are nowhere near austrelia)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने २६७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात अवघ्या १८५ तर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ६८ धावांवर संपुष्टात आला. ज्यामुळे इंग्लंड संघाला हा सामना १ डाव आणि १४ धावांनी गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :
”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली
विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर.
हे नक्की पाहा :