---Advertisement---

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर दिल्या अश्या प्रतिक्रीया

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 4:02 PM
---Advertisement---

दिग्गज टेलिव्हिजन अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी (२ सप्टेंबर ) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास होत नाहीये की, त्यांचा आवडता अभिनेता हे जग सोडून गेला आहे. अनेक चाहते आणि बॉलिवुड स्टार्स सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त करताना दिसून येत आहेत. दरम्यान, क्रिकेट विश्वातील अनेक क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.(Indian cricketers reacts on siddharth shukla’s death)

सिद्धार्थने अनेक दैनिंदिन मालिकांमध्ये मुख्य भूमिका पार पाडली आहे. यासोबत त्याने ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु, त्याला ही वाटचाल जास्त वेळ सुरू ठेवता आली नाही. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ट्विट करत म्हटले की,”आपलं आयुष्य किती नाजूक आहे, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. त्याच्या कुटंबियांना आणि मित्रांप्रती सहानुभूती. ओम शांती.” तर, हरभजन सिंगने ट्विट करत लिहिले की, “हे खूप दुःखद आहे. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला आहे. देव त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

 

तर भारतीय संघातील युवा गोलंदाज, राहुल चहरने देखील या दुःखद घटनेनंतर सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, “मी आश्चर्यचकित आहे, भावपूर्ण श्रद्धांजली सिद्धार्थ आणि त्याच्या प्रियजनांबद्दल माझ्या संवेदना, आयुष्य किती अप्रत्याशित आहे. आपल्याकडे जे आहे त्याचे नेहमीच कृतज्ञ रहा.”

तसेच भारतीय संघातील वेगवान गोलंदाज खलील अहमदने देखील ट्विट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. खलीलने लिहिले की,”हे ऐकून खूप मोठा धक्का बसला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली सिद्धार्थ शुक्ला..”

याव्यतिरिक्त युवराजनेही सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले की ‘युवा आणि प्रतिभाशाली सिद्धार्थ शुक्लाबद्दल ऐकून वाईट वाटले. त्याच्या कुटुंब, मित्रपरिवार आणि चाहत्यांबरोबर माझी सहानूभूती. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.’

सिद्धार्थच्या मागे त्याच्या कुटुंबात आई आणि दोन बहिणी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पदार्पणाचीच तयारी समजा, अर्जुनची सराव सत्रातील गोलंदाजी अगदी बुमराह, मलिंगालाही देतेय टक्कर!

अभिनेता सिद्धार्थच्या मृत्यूनंतर धोनीबद्दलच्या ‘त्या’ ट्वीटची रंगली चर्चा, पाहा नक्की काय होतं त्यात?

थेट डोक्याने २ गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा बनला G.O.A.T., केला ‘हा’ विश्वविक्रम

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---