fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ही दोस्ती तुटायची नाय! टीम इंडियातील जय- विरुच्या ५ जोड्या

Indian Cricketers Who Are Great Friends Of Each Other

क्रिकेट खेळताना मैदानावर खेळाडूंमध्ये छोट्या मोठ्या शाब्दिक चकमकी होत असतात. त्यामुळे एकाच संघातील खेळाडूंमध्ये एकमेकांचे शत्रू निर्माण होतात. मात्र, असेही काही खेळाडू असतात, जे त्यांच्यातील स्पर्धा विसरुन खूप चांगले मित्र बनतात. भारतीय संघात अश्या अनेक खेळाडूंच्या जोड्या आहेत, जे केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरील जिवनातही एकमेकांचे खूप जिवलग मित्र आहेत.

या लेखात आपण भारतीय संघातील अशाच जिवलग मित्रांविषयी जाणून घेणार आहोत.Indian Cricketers Who Are Great Friends Of Each Other

हार्दिक पंड्या – केएल राहुल 

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक फलंदाज केेएल राहुल हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्री केवळ मैदानावर नाही तर मैदानाबाहेरही पाहायला मिळते. लोक त्यांच्या मैत्रीची उदाहरणे देत असतात. त्यांच्यातील मैत्रीची छबी चाहत्यांना प्रथम करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये पाहायला मिळाली होती. तो कार्यक्रम पुढे वादग्रस्त ठरला, तो विषय वेगळा.

विराट कोहली – शिखर धवन

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन हे भारतीय संघातील दमदार खेळाडू आहेत. विराटप्रमाणेच धवनचा स्वभाव हा मस्तिखोर आहे. त्यामुळे त्यांचे एकमेकांत खूप जमते. शिवाय ते दोघेही दिल्लीचे रहिवासी असल्यामुळे ते एकमेकांना खूप समजून घेतात.

विरेंद्र सेहवाग – गौतम गंभीर 

भारताचे माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे नेहमी त्यांच्या प्रदर्शनाने चाहत्यांची मने जिंकत असायचे. तसे तर, सेहवागचे संघातील सर्वच खेळाडूंशी चांगले नाते होते. मात्र, गंभीर हा त्याचा खूप जवळचा मित्र होता. शिवाय दोघेही मिळून सलामीला फलंदाजी करत असल्यामुले त्याची मैत्री अजून घट्ट झाली. एवढेच नाही तर गंभीर आणि सेहवागच्या जोडीला जय-विरु असेही म्हटले जाते. जरी आज ते सोबत क्रिकेट खेळत दिसत नसतील, तरी वास्तवात त्यांची मैत्री खूप पक्की आहे.

एमएस धोनी – सुरेश रैना

भारतीय संघातील सर्वात शांत स्वभावाच्या एमएस धोनीचे संघातील सर्व खेळाडूंशी चांगले नाते आहे. मात्र, सुरेश रैना हा त्याचा सर्वात जवळचा खेळाडू आहे. त्यांच्यातील बॉन्डिग आपल्या फक्त मैदानावर नाही तर मैदानाबाहेरही पाहायला मिळते. दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत असतात.

सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दादा सौरव गांगुली यांनी मिळून त्याच्या कारकिर्दीतच भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत ते दोघेही एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी दोघांनी मिळून बराच काळ सलामीला फलंदाजी केली होती. जरी त्यांना आता ते त्यांच्या जबाबदारीमध्ये व्यस्त असले, तरी वेळ मिळताच ते एकमेकांना भेटण्याची संधी कधीच सोडत नाहीत.

ट्रेंडिंग लेख- 

वनडेत वेगवान दीडशतकी खेळी करणारे ५ फलंदाज

जगातील सर्वात महागडे अंपायर; पगाराच्या रक्कम ऐकून व्हाल अवाक्

६०पेक्षा कमी चेंडूत कसोटीत तुफानी शतक करणारे ४ फलंदाज

You might also like