येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या दौऱ्यावर कुठल्या भारतीय खेळाडूला पदार्पण करण्याची संधी मिळेल याची शक्यता खूप कमी आहे. परंतु ७ असे भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल अधिक माहिती.
प्रवीण आमरे (pravin amre): भारतीय संघ जेव्हा १९९२ मध्ये पहील्यांदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता त्यावेळी डर्बन कसोटीत प्रवीण आमरे यांनी पदार्पण केले होते. प्रवीण यांनी या संधीचे सोने केले आणि पहिल्याच डावात तुफानी शतक झळकावले. हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तसेच अप्रतिम खेळीच्या जोरावर प्रवीण यांची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.
अजय जडेजा (Ajay Jadeja): १९९२ मध्ये डर्बनच्या मैदानावर प्रवीण आमरे यांच्यासह अजय जडेजाने देखील पदार्पण केले होते. परंतु प्रवीण आमरे यांनी ज्याप्रकारची खेळी केली होती. तशी खेळी करण्यात अजय जडेजा यांना अपयश आले होते. ते अवघ्या ३ धावा करत माघारी परतले होते.
डोडा गणेश( Doda Ganesh) : कर्नाटकच्या डोडा गणेश यांनी १९९७ मध्ये झालेल्या मालिकेत पदार्पण केले होते. त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांना या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यांना दोन्ही डावात मिळून १ गडी बाद करता आला होता. या सामन्यात भारतीय संघाला २८२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) : भारतीय संघ जेव्हा २००१ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी वीरेंद्र सेहवागला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्याने ब्लूमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पदार्पण करताना शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेत असा कारनामा करणारा तो दुसराच फलंदाज ठरला होता. पहिल्या डावात त्याने १०५ तर दुसऱ्या डावात त्याने ३१ धावांची खेळी केली होती. या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता.
दीप दासगुप्ता (Dipadas Gupta) : भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता याने देखील २००१ मध्ये पदार्पण केले होते. दीप दासगुप्ताने या सामन्यातील पहिल्या डावात ३४ तर दुसऱ्या डावात ४ धावा केल्या होत्या.
जयदेव उनाडकट (Jaydev unadkat) : भारतीय संघ जेव्हा २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना जयदेव उनाडकटला सेंचुरियनच्या मैदानावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा कसोटी सामना ठरला. त्याला या सामन्यात एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. हा सामना भारतीय संघाने १ डाव २५ धावांनी गमावला होता.(Indian cricketers who made their test debut in South Africa)
जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) : २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यावर केपटाऊनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराहला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. परंतु भारतीय संघाला हा कसोटी सामना ७२ धावांनी गमवावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या :
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
हे नक्की: