भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानात जितका प्रसिध्द आहे, तितकाच मैदानाबाहेर देखील आहे. तो मैदानात आपल्या फलंदाजीमुळे आणि मैदानाबाहेर आपल्या लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने नुकतेच इंस्टाग्रामवर १० कोटी फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो जगातील चौथा खेळाडू तर भारतातील पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे.
अशातच मॉडर्न क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आहेत, ज्यांचा सोशल मीडियावर भरपूर मोठा चाहता वर्ग आहे. ते सतत आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलीदेखील याबाबतीत काही कमी नाहीत. त्यांचा देखील सोशल मीडियावर चांगलाच रुबाब आहे. त्यांचाच आम्ही येथे आढावा घेतला आहे.
भारतीय क्रिकेटपटूंच्या मुली, ज्या सोशल मीडियावर आहेत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध-
१) ग्रेसिया रैना :
माजी कर्णधार एमएस धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या सुरेश रैनाने २०१५ रोजी मेरठमध्ये राहणाऱ्या प्रियंका चौधरीसोबत विवाह केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचे नाव ग्रेसिया ठेवले आहे. ग्रेसिया अगदी कमी वयातच खूप प्रसिद्ध आहे. तिचे इंस्टाग्रामवर १ लाख ८ हजार इतके फॉलोवर आहेत.
https://www.instagram.com/p/CK5zDWaBzlu/?utm_source=ig_web_button_share_sheet
२) सारा तेंडुलकर :
भारतीय संघात मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला, तरी देखील तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी जोडलेला असतो. त्याची २३ वर्षीय मुलगी सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर एकूण १.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.
https://www.instagram.com/p/BUrL26gjW-r/?utm_source=ig_web_button_share_sheet
३) समायरा शर्मा :
भारतीय संघाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याला २०१८ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाली होती. तिचं नाव त्यांनी समायरा ठेवले होते. रोहित शर्मा बरोबरच समायरा देखील सोशल मीडियावर नेहमी झळकत असते.
https://www.instagram.com/p/CGUmJ01BCPY/?utm_source=ig_web_button_share_sheet
४) वामिका कोहली :
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला होता. त्यानंतर २०२१ च्या सुरुवातीलाच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली आहे. तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले आहे. वामिकाची एक झलक पाहण्यासाठी सोशल मीडियावर सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. यावरुन तिची प्रसिद्धी दिसून येते.
https://www.instagram.com/p/CKvOEpOpEG_/?utm_source=ig_web_button_share_sheet
५) झिवा धोनी :
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०१० मध्ये साक्षीसोबत विवाह केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली होती. तिचे नाव त्यांनी ‘झिवा’ असे ठेवले होते. सोशल मीडियावर झिवाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. तिचे सोशल मीडियावर एकूण १.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.
https://www.instagram.com/p/BdzIhtanHAo/?utm_source=ig_web_button_share_sheet
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची नजर कसोटी मालिका विजयावर, ‘या’ अंतिम ११ खेळाडूंसह उतरेल मैदानावर?
वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा इंझमाम-उल-हक
चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाची डोकेदुखी वाढली, ‘या’ चार खेळाडूंपैकी कोणाची करायची संघात निवड?






