ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणारा भारतीय संघ सध्या मेलबर्नमध्ये आहे. दरम्यान रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी, असे काही भारतीय क्रिकेटपटू एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांचे जेवणाचे बिल चक्क एका चाहत्याने भरले होते. याबद्दल या चाहत्यानेच खुलासा केला होता. मात्र आता हे प्रकरण वेगवेगळे वळण घेत आहे.
झाले असे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे. त्यामुळे सध्या खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळाली आहे. यावेळात भारतीय संघाचे खेळाडू सध्या मेलबर्नमध्ये सराव करत आहेत, तसेच रिकाम्या तेथील आजूबाजूच्या परिसरातही फिरत आहे. यादरम्यान भारतीय संघातील काही खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.
त्यावेळी नवलदीप सिंग हा भारतीय संघाचा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता. त्याने आनंदाने भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बिलही भरुन टाकले, तसेच नंतर क्रिकेटपटूंनी आग्रह करुनही बिलाचे पैसे त्याने घेतले नाही. त्यामुळे त्याचे प्रेम पाहून पंतने त्याला मिठी मारली, असा दावा या चाहत्याने ट्विटरवर केला होता.
मात्र त्याच्या या दाव्यामुळे जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात लक्ष घातले असल्याचेही वृत्त समोर आले होते.
पण आता नवलदीपने पुन्हा ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे की ‘पंतने मला मिठी मारली नव्हती. मी जे बोललो ते उत्साहाच्या भरात होते. आम्ही आमच्या संवादांदरम्यान सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळले होते. गैरसमजाबद्दल मी माफी मागतो.’
Clarification – Pant never hugged me it was all said in excitement we maintained social distance all thru:) Apologies for miscommunication @BCCI @CricketAus @dailytelegraph
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 2, 2021
खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात बाहेर खाण्याची व वस्तू विकत घेण्याची परवानगी आहे, मात्र त्यांना सोशल डिस्टसिंग न पाळता चाहत्यांना भेटण्याची परवानगी नाही. त्यामुळे आता या चाहत्याने दिलेले स्पष्टीकरण या प्रकरणात पुरेसे ठरणार आहे की बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबद्दल काही वेगळा निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
अरर..!! चाहत्याने भरलेलं ‘ते’ बिल भारतीय क्रिकेटर्सच्या आलं अंगलट; पंतच्या चूकीचा होणार तपास
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: २० वर्षीय प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणार सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार