---Advertisement---

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत आर्मी’ पोहचली सिडनीत, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 3:10 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतीक्षित वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याला शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली. भारतीय संघ ७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच मैदानावर हजेरी लावणारी ‘भारत आर्मी’ देखील सिडनी क्रिकेट मैदानावर पोहचली. मैदानाबाहेर त्यांचा उत्साह टिपणारा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.

सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी सिडनी क्रिकेट मैदानाबाहेर ‘भारत आर्मीचे’ सदस्य ड्रम्सच्या तालावर थिरकताना दिसले. ऑस्ट्रेलियन पत्रकार मेलिंडा फरेलने ह्या अनोख्या डान्सचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘All is quiet outside SCG’, असे गमतीशीर कॅप्शनही मेलिंडा फेरेलने ह्या व्हिडिओला दिले आहे.

https://twitter.com/keshava_ntr/status/1332159366154178561

प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामना पाहण्याची संधी

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने ह्या मालिकेत मैदानाच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चाहते मैदानावर जाऊन खेळाचा आनंद लुटणार आहेत. सामन्याच्या दोन दिवस आधीच सगळी तिकीटे संपल्याची माहिती सिडनी क्रिकेट मैदानाच्या व्यवस्थापनाने दिली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळण्याची संधी बर्‍याच काळानंतर भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

लंका प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात कोलंबो किंग्जचा कॅंडी टस्कर्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय

‘हा’ भारतीय वनडेतील सर्वात महान खेळाडू, ऍराॅन फिंचने थोपटली पाठ

‘या’ गोष्टीमुळे भारतीय संघात आत्मविश्वास; सिडनीत मागील पाचही वनडे सामन्याचा काय आहे निकाल पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---