भारत दौर्यावर आलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारत दौरा सुरू होण्यापूर्वी अनेकांनी इंग्लंडच्या संघाला कमी लेखले होते. बऱ्याच माजी खेळाडूंनी व जाणकारांनी असा अंदाज व्यक्त होता की, इंग्लंड या कसोटी मालिकेत एकही सामना जिंकणार नाही.
मात्र, इंग्लंडने पहिल्या कसोटीत विजय मिळवून सर्वांची तोंडे गप्प केली. या कामगिरीमुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन खूप उत्साही आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या विजयानंतर त्याने ट्विटरवरून भारतीय संघाची मजा घेतली. भारतीय संघाने वॉनला अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही, परंतु, चाहत्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले.
असे आहे प्रकरण
चेन्नई येथे झालेली कसोटी इंग्लंडचा कर्णधार जो रूटची १०० वी कसोटी होती. रूटने दुहेरी शतक झळकावून ही कसोटी संस्मरणीय केली आहे. सोबतच संघाच्या विजयाने त्याचा आनंद द्विगुणीत झाला. परंतु वॉनने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत विचारले की, “भारतीय संघाने रूटला १०० वी कसोटी खेळण्यासाठी काही भेट दिली आहे का? अगदी तशीच जशी जशी त्यांनी ब्रिस्बेन कसोटीत १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी नॅथन लायनला भेट दिली होती.”
India gifted @NathLyon421 a signed shirt for his 100th Test at the end of the Gabba Win … Did @root66 receive one today after the loss ?? Not sure if it happened ? Can anyone confirm ?
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 9, 2021
चाहत्यांनी दिले वॉनला प्रत्युत्तर
भारतीय संघ वॉनला मैदानावर उत्तर देईल. मात्र, भारतीय संघाच्या चाहत्यांनी त्याला ट्विटरवर त्याच भाषेत उत्तर दिले. एका चाहत्याने लिहिले, “तुम्ही भारताला १५० वर्ष लुटले आणि आमचे अनेक क्रांतिकारी त्यात मारले. तुम्ही आमचा कोहिनूर हिरा परत करा तेव्हा तुम्हाला तो टी-शर्ट मिळेल.”
No. You guys have already looted us for 150 years and have killed numerous freedom fighters as well.
Return our Kohinoor first and then only we may think of gifting that t-shirt.— Sandeep Parkhi (@sparkhi) February 9, 2021
अन्य एका चाहत्याने लिहिले, “ही मालिका जिंकल्यानंतर तो टी-शर्ट मिळेल. भारतीय संघाची खिल्ली उडवू नका. कारण हा संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. तुमच्या संघाला दुस-या कसोटीसाठी तयार राहायला सांगा.” दुसऱ्या एका चाहत्याने चेन्नईमधील हॉटेल व्यवस्थापनाने केक कापून जो रूटचे स्वागत केल्याचा व्हिडिओ शेअर केला. सोबतच वॉनला विचारले, “हे पाहून घे मायकल.”
India will give root a signed t shirt .. let India win the series .. and then will return u the favour .. don’t b too sarcastic sir .. India always known for come back .. and b prepare for solid come back in next test
— Sahil Aggarwal (@Sa24102013) February 9, 2021
We have kept it ready. Will handover after we win the series 3-1.
— Rajesh Abraham🇮🇳 (@pendown) February 9, 2021
या व्यतिरिक्त अन्य चाहत्यांनीदेखील त्याला फैलावर घेतले. मायकेल वॉन सातत्याने भारतीय संघावर टीका करत असतो व भारतीय चाहते त्याला उत्तर देत असतात. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेआधी त्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात एकही सामना जिंकता येणार नाही, असे म्हटले होते. मात्र, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मालिका विजय साजरा केल्याने वॉन जोरदार ट्रोल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
जो रूट फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड मोडू शकेल, ‘या’ दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
बंगलोरच्या संघात संजय बांगर यांची ‘रॉयल’ एंट्री, संघासाठी पार पाडणार ‘ही’ भूमिका
एकेकाळी बूट घ्यायला ही पैसे नसणारी सोनाली शिंगटे आज आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटूंपैकी एक