---Advertisement---

‘चहलला बाहेर काढा’ सोशल मीडियावर चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 2:22 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची गोलंदाजी आशिया चषक 2022 पासून खराब होत आहे. तो प्रत्येक सामन्यात महागडा ठरताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही तो चांगलाच महागात ठरला होता. चहलने 3.2 षटकात 42 धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकच बळी घेता आला. चहलच्या आणखी एका खराब कामगिरीने चाहते मात्र नाराज झाले आहेत. चहल हा चांगला टी20 गोलंदाज नसून, त्याला संघातून वगळून दुसऱ्याला संधी द्यायला हवी, असे चाहत्याचे मत आहे. ट्विटरवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,

 

‘आता इतरांना संधी द्या. सध्या भारतीय क्रिकेट संघाची सर्वात मोठी समस्या चहलच आहे.’

आणखी एका चाहत्याने लिहिले,

 

‘चहल फॉर्ममध्ये नाहीतर तुम्ही बिश्नोईला संधी द्यायला हवी.’

 

अन्य एका ट्विटर हँडलवरून लिहीले गेले की,

‘भुवनेश्वर कुमारच्या 19 व्या षटकामूळे तुम्ही चहलच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत आहे. आशिया चषकातही तो देखील असाच खेळला होता.’

चहाल सध्या भारताचा सर्वात अनुभवी लेगस्पिनर आहे. त्याला मागील विश्वचषकात संधी मिळाली नव्हती. मात्र, यावर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करता आले. तो मागील काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. तरीदेखील त्याचा विश्वचषक संघात समावेश केला गेला आहे. तसेच त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ज्याची मागणी होतेय, तो रवी बिश्नोई संघाचा राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला ‘युनिवर्सल बॉस’
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
अस काय घडलं की भर मैदानात रोहितने पकडला कार्तिकचा गळा? पाहा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---