---Advertisement---

मॅक्लनघनची भारतीय संघावर जहरी टीका; चाहत्यांनी दिले सडेतोड उत्तर

On: शुक्रवार, डिसेंबर 10, 2021 11:02 PM
mitchell-mcclenaghan
---Advertisement---

नुकताच भारत आणि न्यूझीलंड (INDvNZ) या संघांदरम्यान टी२० व कसोटी मालिका खेळली गेली. भारतात खेळल्या गेलेल्या या मालिकेत यजमान संघाने न्यूझीलंडला दोन्ही मालिकांमध्ये पराभूत केले. या विजयांसाठी भारतीय संघाचे कौतुक होत असतानाच, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लनघन (Mitchell McClenaghan) याने भारतीय संघावर टीका केली आहे. त्याने भारतीय संघावर टीका करणारे ट्विट केल्यावर, भारतीय चाहत्यांनी त्याला धारेवर धरले.

काय म्हणाला मॅक्लनघन
अनेक वर्षे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या मॅक्लनघन याने ट्विट करून भारतीय संघावर टीका केली. त्याने लिहिले,
‘भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) न्यूझीलंडला घरच्या मैदानावर हरवून खुश आहे. भारतीय संघाला विजय शुभेच्छा.’

https://twitter.com/Mitch_Savage/status/1468016024750465025?t=DkZta5AUwqsthBToD1w74w&s=19

मॅक्लनघन याचे हे ट्विट भारतीय चाहत्यांना अजिबात आवडले नाही. चाहत्यांनी त्याला यानंतर चांगलेच फैलावर घेतले. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘न्यूझीलंड संघाचा चाहता म्हणून मला हे अजिबात आवडले नाही. तुमचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) म्हणतो की पराभव मोठ्या मनाने स्वीकारायला हवे.’

अन्य एका चाहत्याने लिहिले,
‘सर्वच संघ आपल्या घरच्या मैदानावर वाघ असतात. भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन पराभूत केले आहे. त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकत नाही. तुम्ही हा पराभव स्वीकारावा.’

https://twitter.com/NasirSahak/status/1468061217252167684?t=2WrduAFZaszooA58O-BG_Q&s=19

भारतीय संघाने केला न्यूझीलंडचा पराभव
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेत यजमान भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे नाट्यमयरित्या अनिर्णीत राहिला. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ३७२ धावणे येतीहासिक विजय साजरा केला.

महत्त्वाच्या बातम्या-

वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणतेय, “आम्ही वुमेन्स आयपीएलबाबत आशावादी”

“रोहित यावर्षीचा सर्वोत्तम टी२० व कसोटी फलंदाज असेल”

ओमिक्रॉनच्या सावटाखाली ‘इतके’ दिवस ‘टीम इंडिया’ राहणार दक्षिण आफ्रिकेत; ‘या’ दिवशी होणार रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---