भारतात सध्या कृषी कायद्याविषयी असंतोष वाढत आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. इतर राज्यांमध्येही आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसतेय. याच आंदोलनाचे लोण आता सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियामध्ये पसरलेले दिसून येतेय. भारत सरकारविरुद्ध ऑस्ट्रेलियातील मैदानावर घोषणाबाजी करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी घोषणाबाजी
सध्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मेलबर्न येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. भारताने पहिल्या दोन्ही दिवसावर वर्चस्व गाजवत, सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली दिसून येते. त्याचवेळी, सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियातील एका मैदानावर भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये शीख समुदायातील काही युवक सामन्यादरम्यान कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत, ‘मोदी सरकार हाय हाय.. मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा प्रकारच्या घोषणा देताना दिसत आहेत. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील असल्याचे निदर्शनास येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान काही दिवसांपूर्वी सिडनी येथे २ वनडे व २ टी२० सामने खेळले गेले होते. त्यापैकीच एका सामन्यातील हा व्हिडीओ असू शकतो. वनडे मालिकेच्या सुरुवातीला भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधातही सिडनी क्रिकेट ग्राउंडबाहेर घोषणाबाजी झाली होती.
🤣🤣🤣 awesome #AUSvIND
— Minnie S (@Minnie_S) December 26, 2020
दिल्ली येथे आंदोलन करत आहेत पंजाबचे शेतकरी
ऑगस्ट महिन्यापासून पंजाबचे शेतकरी दिल्ली येथे भारत सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. या आंदोलनाला अनेक सिनेअभिनेते, खेळाडू तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर लोकांनी पाठिंबा दिला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग व भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्या परिवारानेदेखील या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा या आंदोलनात सहभागी झाला नाही म्हणून अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले होते.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– कॅप्टनकूल धोनीची बाजी! टी२० पाठोपाठ आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे संघाचाही कर्णधार
– NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात