Avesh Khan, INDvsSA 2nd Test: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला. त्यानंतर आता भारतीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या केपटाऊन कसोटीपूर्वी मोठा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात केपटाऊन (Cape Town) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान पार पडेल. अशात या सामन्यापूर्वीच भारतीय संघात वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याला सामील केले गेले आहे. खरं तर, मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे मालिका सुरू होण्यापूर्वीच संघातून बाहेर पडला होता. त्याच्या जागी बीसीसीआयने अद्याप कोणत्याही बदली खेळाडूची घोषणा केली नव्हती. आता आवेश त्याच्या जागी भारताकडून खेळेल.
https://twitter.com/BCCI/status/1740619098244198752
भारतीय क्रिकेट संघ यजमान दक्षिण आफ्रिकेकडून सेंच्युरियन कसोटी सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला होता. पाच दिवसांचा सामना भारताने 3 दिवसातच गमावला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे 31 वर्षांपासूनचे स्वप्नही अपूर्णच राहिले. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्यापासून पुन्हा वंचित राहिला. यापूर्वीही भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 वेळा दौरा केला होता, ज्यात भारताला 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला, तर 1 मालिका अनिर्णित राहिली.
आवेश खान वनडे मालिकेचा भाग
वेगवान गोलंदाज आवेश खानविषयी बोलायचं झालं, तर तो या दौऱ्यात कसोटीपूर्वी वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. मालिकेतील पहिल्या वनडेत आवेशने मॅच विनिंग गोलंदाजाची भूमिका निभावली होती. त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. शमीला पहिल्या कसोटीत जागा दिली गेली होती, पण त्याचवेळी सांगण्यात आले होते की, त्याच्या खेळण्याचा निर्णय फिटनेस पाहून घेतला जाईल. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमीला अनफिट घोषित केले. ज्यानंतर तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. शमी वनडे विश्वचषकानंतर भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने विश्वचषकात 7 सामन्यात सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यु ईश्वरन, आवेश खान. (indian fast bowler avesh khan replaces mohammed shami for ind vs sa 2nd test cape town)
हेही वाचा-
टीम इंडियाच्या पराभवामुळे WTC Points Tableमध्ये मोठा बदल, रोहितसेनेची टॉपवरून थेट ‘या’ स्थानी घसरण
Team India Penalised: भारताला धक्क्यावर धक्के! ICCची मोठी कारवाई, आख्ख्या संघाला ठोठावला दंड






