भुवनेश्वर येथे खेळल्या गेलेल्या इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाने विजय मिळवला. कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने 2-0 असा विजय संपादन केला. भारतासाठी कर्णधार सुनील छेत्री व छांगते यांनी गोल झळकावले.
https://www.instagram.com/p/Cto0cbwB83C/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
यजमान भारतीय संघाने साखळी फेरीत एक विजय व दोन बरोबरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. घरच्या मैदानामध्ये खेळत असलेल्या भारतीय संघाला या सामन्यासाठी पसंती दिली जात होते. भारताच्या स्ट्रायकर्सने अगदी पहिल्या मिनिटापासून लेबनॉनच्या गोल क्षेत्रात हल्ले चढवले. मात्र, लेबनॉनने भक्कम बचाव करत हे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्य हाफमध्ये एकही संघ गोल ना करू शकल्याने बरोबरी राहिली.
दुसऱ्या हाफमध्ये मात्र भारतीय संघाने सुरुवातीलाच आघाडी घेतली. कर्णधार सुनील छेत्री याने गोल करत, ही आघाडी मिळवून दिली. आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाने त्यानंतरही गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. छांगते याने डाव्या बाजूने चालत करत, गोल झळकावून भारतीय संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने खेळ काहीसा संथ केला. लेबनॉनने अखेरच्या काही मिनिटांमध्ये आक्रमण वाढवले. मात्र, भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांना अपयश आले.
(Indian Football Team Win Intercontinental Cup 2023 Beat Lebanon Chhetri And Chhangte Scores)
महत्वाच्या बातम्या –
बॅझबॉल इफेक्ट! स्टोक्सने ख्वाजाविरूद्ध लावली अनाकलनीय फिल्डिंग, पाहा पुढे काय घडले
बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी