कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. आतापर्यंत कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल पाहायला मिळाले आहेत, ज्याचा परिणाम त्यांच्या सामना निकालावर स्पष्टपणे दिसत आहे. सोमवारी (०९ मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही कोलकाताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले होते. अजिंक्य रहाणे, पॅट कमिन्स, वेंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि शेल्डन जॅक्सन यांचे संघात पुनरागमन झाले होते. हा बदल कोलकातासाठी सकारात्मक ठरला व त्यांनी ५२ धावांनी मुंबईला पराभूत केले.
असे असले तरीही, अद्याप कोलकाता संघाला (Kolkata Knight Riders) त्यांचे योग्य संयोजन सापडलेले नाही. त्यामुळे मागील हंगामातील प्रदर्शनाच्या तुलनेत या हंगामात कोलकाता संघाचे प्रदर्शन खालावलेले दिसत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील या संघाच्या परिस्थितीबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एका वेबसाइटशी बोलताना कैफ म्हणाला की, “बाहेरून पाहिले तर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) यांच्यामध्ये समीकरण किंवा ताळमेळ बरोबर दिसत नाहीत. असेही नाहीये की, कोलकाता संघाकडे चांगले खेळाहू नव्हते. त्यांच्याजवळ खेळाडू होते. परंतु त्यांना खेळवले गेले नाही आणि संघ व्यवस्थापनाने त्यांच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये भरपूर बदल केले. याच बदलांनी खेळाडूंवर दबाव बनवण्याचे काम केले.”
“खेळाडूंना अशा प्रकारच्या वातावरणात खेळणे अवघड वाटते. टी२० हे क्रिकेटचे असे स्वरूप आहे, ज्यामध्ये दबावाच्या स्थितीतही तुम्ही चांगले खेळू शकता. तुम्हाला तुमचे आवडते शॉट खेळायचे असतात आणि विकेट्स घ्यायच्या असतात. परंतु जर संघात असे वातावरण असेल तर, कोणीही दबावात टिकू शकणार नाही. खरे तर सध्या कोलकाता संघाच्या परिस्थितीसाठी त्यांचे संघ व्यवस्थापन जबाबदार असून त्यांनी आपली चूक मान्य करायला पाहिजे. कारण त्यांनी संघात खूपच बदल केले आहेत,” असेही कैफने पुढे म्हटले.
पुढे ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल बोलताना कैफ म्हणाला की, “मला एक सामना आठवण आहे, जो राजस्थानविरुद्ध झाला होता. या सामन्यात चहलने हॅट्रिक घेतली होती. जेव्हा श्रेयस बाद झाला होता, तेव्हा तो डगआऊटकडे येताना काही वेळ थांबला आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमशी काहीतरी बोलताना दिसला होता. यावेळी श्रेयसच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे निराशा दिसत होती. कदाचित तो कमिन्सच्या फलंदाजी क्रमामुळे चिडला होता. ही कोलकाता संघाच्या पराभवाची सुरुवातीची वेळ होती. यावरून दिसून आले की, त्यांच्या कर्णधार आणि प्रशिक्षकामध्ये सर्वकाही अलबेल नाही. श्रेयससारखा शांत खेळाडू प्रश्न विचारायला सुरू करतो, म्हणजे ही मोठी गोष्ट आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश
राजस्ठानचा धाकड फलंदाज हेटमायर बनला ‘बाप’माणूस, गोंडस व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजीत मुंबईची घसरगुंडी, संतापलेल्या रोहितने ‘यांना’ ठरवले पराभवाचे जबाबदार