टोकियो ऑलिम्पिक २०२० सुरू होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे देशातही उत्साहाचे वातावरण वाढत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राज्यांनी पदक जिंकल्यानंतर खेळाडूंचा बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. यासह, केंद्र सरकारने रोख बक्षीस जाहीर केले.
या राज्यांनी केली सर्वाधिक बक्षिसाची घोषणा
हरियाणाच्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले तर राज्य सरकार त्याला सहा कोटी रुपयांचे रोख बक्षीस देईल. दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यास त्याला २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. या व्यतिरिक्त दिल्ली सरकारनेही आपल्या खेळाडूंना पदक जिंकल्याबद्दल रोख रकमेची घोषणा केली आहे. दिल्ली येथील खेळाडूंना सुवर्ण पदक जिंकल्यानंतर ३ कोटी, रौप्यपदक जिंकल्यानंतर ३ कोटी आणि कांस्यपदक जिंकल्यानंतर १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यासह पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना दहा लाख रुपयांची रक्कम देण्यात येईल.
ओडिशा व छत्तीसगड राज्यही देणार बक्षिस
त्याशिवाय ओडिशा आणि छत्तीसगड सरकारनेही आपापल्या राज्यातील खेळाडूंना सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल ६ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि गुजरात सरकारनेही त्यांच्या खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या आपल्या राज्यातील खेळाडूंना २ कोटी, रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना १ कोटी आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे. याबरोबरच महाराष्ट्र सरकारने देखील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्या खेळाडूंना रोख बक्षीस जाहीर केले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास महाराष्ट्रातील खेळाडूंना १ कोटी रुपये, रौप्यपदक जिंकल्यास ७५ लाख रुपये आणि कांस्यपदक जिंकल्यास ५० लाख रुपये रोख देण्याची घोषणा महाराष्ट्राने केली.
केंद्र सरकार देणार इतके बक्षीस
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकल्यानंतर केंद्र सरकार सर्व खेळाडूंना स्वतंत्र रोख बक्षीस देईल. सुवर्ण पदक जिंकल्यास केंद्र सरकारतर्फे खेळाडूंना ७५ लाख रुपये, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ५० लाख आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ३० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव, ‘या’ स्पर्धेतील दोन सामन्यांना मुकणार
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसला तरी, आयपीएलमुळे युवा खेळाडूंमध्ये आहे आत्मविश्वास”





