पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एका दिवसात 3 कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची विनेश फोगट अशी कामगिरी करणारी ती पहिलीच माहिला खेळाडू ठरली. मात्र यानंतर फायनलपूर्वी ती ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली. विनेश महिलांच्या 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये खेळणार होती, मात्र त्याआधीच तिला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. तिला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवल्यात आले. पण या दरम्यान भारत सरकारकडून देखील तिला स्पर्धा खेळण्यासाठी मोठी रक्कम मिळाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक खेळण्यासाठी तिच्या प्रशिक्षणावर एकूण 70,45,775 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी असेही म्हणाले की, 70 लाख 45 हजरांपैकी तिला 53 लाख रुपये ऑलिम्पिक पदक जिंकण्याची हमी असणाऱ्या खास खेळाडू कोटा मधून देण्यात आले होते. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्स मध्ये देण्यात आली आहे.
वास्तविक, फायनलसाठी अपात्र ठरल्यानंत विनेश खूपच नाराज झाली होती. तिची कामगिरी पाहता भारताला सुवर्ण पदक मिळणार अशी आशा निर्माण झाली होती. पण वजन वाढल्याने ती बाहेर पडली परिणामी ती अपात्र ठरली. मात्र या निराशामुळे तिने टोकाचे मिर्णय घेत कुस्तीमधून निवृत्तीची घेषणा केली. आज गुरुवार (08 ऑगस्ट) तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहीती दिली.
हेही वाचा-
सुवर्ण पदकाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा, या खेळाडूचा सर्वोत्तम थ्रो नीरज चोप्रापेक्षाही चांगला!
भल्या भल्यांना नाही जमलं, ते या 21 वर्षीय फिरकीपटूने केलं, भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच
टीम इंडियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर श्रीलंकेला मोठा धक्का, फिरकी गोलंदाजावर फिक्सिंगचे आरोप!