भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर खेळपट्टी मऊ असल्याचे सांगितले. त्यामुळे खेळाडूंनी थोडी सावधगिरी राखली पाहिजे, असे द्रविडने बीसीसीआय टीव्हीला सांगितले. ते पुढे म्हणाले “अर्थातच नासाउचे मैदान चांगले आहे. मैदान थोडे मऊ आहे आणि खेळाडूंना त्याचा परिणाम पायांच्या स्नायूंवर आणि पिंडऱ्यावर जाणवू शकतो. त्यामुळे या क्षेत्रावर काम केले पाहिजे आणि खेळाडूंना कोणतेही अडचण येऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. असे
“खेळपट्टी थोडी मऊ होती, परंतु मला वाटते की आम्ही ती परिस्थिती चांगली हाताळली,” द्रविड म्हणाला. त्या विकेटवर फलंदाजांनी उत्तम धावा केल्या आणि गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टीवर उसळी आहे. ज्याने फलंदाजीत खेळाडूंना चांगलीच कस लागते.
दरम्यान, सराव सामन्यातील विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही अद्याप फलंदाजीचा क्रम निश्चित केलेला नाही. रिषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यावर रोहितने सांगितले की, मी हे केवळ त्याला संधी देण्यासाठी केले. नवीन ठिकाण, नवीन मैदान, ड्रॉप-इन खेळपट्टी, त्याच्याशी जुळवून घेणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते आणि आम्ही चांगली कामगिरी केली.
टीम इंडीयाचे पुढील तीन सामने या मैदानावरच होणार आहेत. पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध तर 9 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. आता अश्या परिस्थितीत हेड कोचच्या या नाराजीवर आयसीसी कडून खेळपट्टीसाठी काय उपाययोजना करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 3 रोमांचक सुपर ओव्हर्स! न्यूझीलंडचा दोनदा झालाय पराभव
रियान परागने दिली विश्वचषकाबद्दल तिखट प्रतिक्रिया! “टी20 विश्वचषक पाहण्यात कोणताही रस नाही! पण शेवटी…”
वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना, चर्चा मात्र हार्दिक पांड्याची! नेमकं काय घडलं जाणून घ्या