भारतीय हॉकी संघाला दोन दिवसांमध्ये तिसरा मोठा धक्का बसला आहे. संघाच्या अजून एक अनुभवी खेळाडू एसव्ही सुनीलने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय संघासाठी फॉरवर्डला खेळणारा, अर्जुन पुरस्कारविजेता ३२ वर्षाच्या सुनीलने शुक्रवारी(१ ऑक्टोबर) त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. त्याने ट्वीटरवर एक भावुक पोस्ट लिहीली असून युवा खेळाडूंनी संधी मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
सुनीलने २००७ मध्ये भारतीय संघासोबत त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने त्याच्या हॉकी कारकिर्दीत २०१२ साली लंडन आणि २०१६ साली रियो या दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो भारतीय संघात नव्हता.
त्याने त्याच्या १४ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत २६४ सामने खेळले असून यामध्ये ७२ गोल केले आहेत. तो त्याच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासीक क्षणांचा साक्षीदारही राहिला आहे. त्याने २०१४ मध्ये राष्ट्रकुट खेळांमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तसेच २०१४ एशियाई खेळांमध्ये सुवर्णपद आणि २०१८ एशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचाही तो प्रतिनिधी होता. त्याने या सामन्यांमध्ये संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली होती.
सुनीलने त्याच्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, “१४ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय जर्सी घातली होती. मी निर्णय घतला आहे की, मी पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कॅंपचा भाग राहणार नाही. जर मी म्हटलो की, मी आनंदी आहे, तर हे सर्वांसोबत खोट बोलणं होईल.”
त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “माझी नेहमीच इच्छा होती की, मी माझ्या संघाला ऑलिम्पिक पोडियममध्ये पोहचवण्यात मदत करावी. पण त होऊ शकले नाही. पण माझ्या सहकाऱ्यांद्वारे कांस्य जिंकणे खास क्षण आहे”
“पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला फक्त तीन वर्ष बाकी आहेत. अशात एका वरिष्ठ खेळाडूच्या रूपात माझ्यासाठी गरजेचे आहे की, मी युवकांना रस्ता द्यावा आणि भविष्यासाठी एक विजेता संघ बनवण्यात भूमिका पार पाडावी,” असेही त्याने स्पष्ट केले आहे.
Making A Statement… #Hockey @TheHockeyIndia pic.twitter.com/eg9Al6J5ut
— SV Sunil | ಎಸ್.ವಿ. ಸುನಿಲ್ (@SVSunil24) October 1, 2021
दरम्यान, सुनीलने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेण्याच्या एक दिवसापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ खेळाडू रुपिंदर सिंग आणि बीरेंद्र लाकडा यांनीही आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे. या तिन्ही खेळाडूंच्या निवृत्तीनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘यो तेरे बाप का घर कोणी, थाणा है, चुपचाप खडा रह’, नीरजने बिग बींना शिकवली हरियाणवी- VIDEO