---Advertisement---

चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 6:54 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला आहे. टीम इंडियानं आपल्या शेवटच्या पूल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला.

भारतीय संघाचा हा विजय ऐतिहासिक आहे, कारण टीम इंडियानं ऑलिम्पिकमध्ये तब्बल 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची नोंद केलीय. 1976 पासून ऑलिम्पिकमध्ये हॉकी ॲस्ट्रोटर्फवर खेळली जात आहे. तेव्हापासून भारतानं प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय. याआधी 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगनं दोन गोल केले. तर अभिषेकनं एक गोल केला. भारतानं पहिल्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियानं एक गोल केला. टीम इंडियानं तिसऱ्या क्वार्टरमध्ये एक गोल करत 3-1 ने आघाडी मिळवली. यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियानं आणखी एक गोल केला. अशा प्रकारे भारतानं हा सामना 3-2 असा जिंकला. शेवटच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियानं कडवी झुंज दिली. ब्लेक गोवर्सने पेनल्टी स्ट्रोकसह 3-2 अशी बरोबरी साधली. परंतु गोलकीपर पीआर श्रीजेशनं शेवटच्या मिनिटाला उत्कृष्ट बचाव करत भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय संघानं याआधीच पूल बी मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी भारताला गत ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाशिवाय न्यूझीलंड आणि आयर्लंडचा पराभव केला. तर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. भारताशिवाय बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना या संघांनी पूल बी मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पूल बी मध्ये बेल्जियम पहिल्या, भारत दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि अर्जेंटिना चौथ्या स्थानावर आहे.

भारत पूल बी मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना पूल ए मध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल. उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियासमोर ग्रेट ब्रिटन किंवा जर्मनी यापैकी एकाचं आव्हान असेल. भारतानं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. या ऑलिम्पिकमधील आतापर्यंतची कामगिरी पाहता टीम इंडिया यावेळी आपल्या पदकाचा रंग बदलू शकते. ​​2024 ऑलिम्पिकमध्ये फक्त बेल्जियमनं भारताला हरवलं आहे.

हेही वाचा – 

मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप, एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी बक्षीस रक्कम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---