ऍथलेटिक्समधील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेला शुक्रवारी (5 मे) सुरुवात झाली. या स्पर्धेत भारतीय भालाफेकपटू व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्याने 88.67 मीटर भाला फेकत पहिला राउंड आपल्या नावे केला.
Neeraj Chopra wins! 🇮🇳
With a thunderous throw of 88.67m, he dominated the Doha Diamond League and brought glory home. A true champion who has made the nation proud again.
Congratulations Neeraj on this stupendous win! 🎉 pic.twitter.com/WqtkG4EdNs
— Anurag Thakur (मोदी का परिवार) (@ianuragthakur) May 5, 2023
नीरज मागील डायमंड लीगचा विजेता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. लोहा येथील पहिल्या राऊंडमधील पहिल्याच फेकीवर त्याने 88.67 मीटर इतका भाला फेकत आघाडी घेतली. त्यानंतर त्याला पुढील चार प्रयत्नात या कामगिरीच्या जवळ जाता आले नाही. अखेरचा प्रयत्नात त्याने 86.52 इतकी फेक केली. पहिल्या फेकीमुळे त्याला आपली आघाडी टिकवण्यात यश आले व त्याने पहिल्या राउंड मध्ये वर्ल्ड लीड घेतली.
दुसऱ्या स्थानी चेक रिपब्लिकचा जाकुब राहिला त्याने नीरजला चांगली लढत देत 88.63 मीटर इतके अंतर पार केले. आता वर्षभरात या लीगचे विविध राउंड वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळण्यात येतील. डिसेंबर मध्ये युजीन येथे स्पर्धेचा समारोप होईल. त्यावेळी नीरज पुन्हा एकदा आपले विजेतेपद राखण्यात यशस्वी होतो का हे पाहावे लागेल.
नीरजने या स्पर्धेत आपली सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी करण्याचा मानस व्यक्त केला होता. डायमंड लीगमध्ये आपण 90 मीटरचा टप्पा पार करून असे त्याने म्हटलेले. त्याची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटर अशी राहिली आहे.
(Indian Javelin Thrower Neeraj Chopra Tops First In Doha Diamond League)