टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव पराभव सोडला, तर भारताने परत एकही पराभव मिळवला नव्हता. मात्र, आता भारताला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. शनिवारी (३ ऑगस्ट) भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे भारताचे स्वप्न संपुष्टात आले आहे. आता भारतीय हॉकी संघ कांस्य पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.
उपांत्य सामन्यात बेल्जियमचा सामना करत असलेल्या भारतीय संघ पहिल्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला ०-१ ने पिछाडीवर राहिला. जागतिक चॅम्पियन बेल्जियमकडून लोईक लुईपेर्टने पहिल्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. (Indian men’s hockey team loses to Belgium 5-2 in the semi-final, to play for bronze medal)
We played our heart out against Belgium, but it just wasn't our day. 💔#INDvBEL #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/I5AzuayqOq
— Hockey India (@TheHockeyIndia) August 3, 2021
यानंतर पुनरागमन करत भारताने सामन्याच्या ७ व्या मिनिटाला गोल करत १-१ ने बरोबरी साधली. यानंतर लगेच ८ व्या मिनिटाला दुसरा गोल करत बेल्जियमवर २-१ ने आघाडी घेतली.
आतापर्यंत या ऑलिंपिकमध्ये पेनल्टी कॉर्नरवर केवळ एक गोल खाणाऱ्या बेल्जियमविरुद्ध हरमनप्रीत सिंगने शानदार गोल केला. यानंतर पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगनेही शानदार मैदानी गोल करत भारताला २-१ ने आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुर्जंत सिंगच्या चुकीमुळे १८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताने बेल्जियमविरुद्ध बचाव करत आपली आघाडी कायम राखली. मात्र, एका मिनिटानंतर बेल्जियमला मिळालेल्या ५ व्या पेनल्टी कॉर्नरवर अलेक्झांडर हेंड्रिक्सने स्कोर २-२ ने बरोबरीवर आणला. हा त्याचा टोकियो ऑलिंपिक्समधील १२ वा गोल आहे.
उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पहिला हाफ संपण्यापर्यंत २-२ अशी बरोबरी साधली होती.
टोकियो २०२० मध्ये पुरुष हॉकी उपांत्य सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये २-२ ने बरोबरी साधल्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय हॉकी संघ आणि बेल्जियममध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. भारताला आपला ५ वा पेनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र, गोल करण्यात त्यांना अपयश आले. आताही स्कोर २-२ ने बरोबरीत आहेत.
या सामन्यात शेवटच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला तिसरा गोल करण्यात यश आले. सामन्यात ४९ व्या मिनिटाला अलेक्झांडर हेंड्रिक्सने आपल्या संघाला ९ व्या पेनल्टी कॉर्नरला गोल करत आपल्या संघाला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आता त्याने पहिल्याच ऑलिपिक्समध्ये आपला १३ वा गोल केला आहे.
शेवटच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला ५२ व्या आणि ५३ व्या मिनिटात सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. त्यावर भारतीय गोलकीपर श्रीजेशने जोरदार बचाव केला. मात्र, पाचवा कॉर्नर जेव्हा पेनल्टी स्ट्रोकमध्ये बदलला, तेव्हा तोही फेल ठरला. यानंतर अलेक्झांडर हेंड्रिक्सने १४ वा गोल करत स्कोर ४-२ असा केला.
दुसऱ्या हाफमध्ये भारताच्या खराब खेळी आणि एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नरमुळे त्यांचे ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न तुटले आहे.
रिओ ऑलिंपिक्स २०१६चा रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने हा सामना ५-२ ने खिशात घालत दुसऱ्यांदा ऑलिंपिक्समध्ये अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. बेल्जियमच्या विजयाचा शिल्पकार अलेक्झांडर हेंड्रिक्स राहिला. त्याने सामन्यात हॅट्रिक गोल करत आपल्या पहिल्याच ऑलिंपिक्समधील १४ गोल पूर्ण केले.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिम्पिक: सोमवारी ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी; ११ व्या दिवसाचे असणार ‘असे’ वेळापत्रक
-कौतुक तर होणारच! भारतीय हॉकी महिला संघाची ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनीही थोपटली पाठ